Fruits and vegetables are universally promoted as healthy. Diets high in fruits and vegetables are widely recommended for their health-promoting properties. Certain fruits and vegetables are rich sources of vitamin C, but these rich sources (citrus fruits, strawberries, green peppers, white potatoes) are spread over many fruit and vegetable categories. This article will teach us Health Benefits of Fruits and Vegetables.
मानवी आरोग्य म्हणजे पोषणमूल्यांच्या आवश्यकतेचा विचार करणे आवश्यक आहे. जीवनसत्वे, प्रथिने, कार्बोदके अशा पोषणमूल्यांनी युक्त आहार म्हणजे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली याच सोबत शरीराला गरज असते ती कॅल्शियम झिंक,लोह आयोडीन आणि मॉग्नेशिअम या खनिजांची. त्वचा, रक्त, हाडांचे आरोग्य राखण्यात हि खनिजे महत्वाची असतात. खनिजांच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती, कमी होणे, हृदयाचे अनियमित ठोके, ऑनिमिया या समस्यां निर्माण होऊन आजार तयार होतात. खनिजांच्या अतिरिक्त सेवनाने शरीरात विषद्रव्ये तयार होऊ शकतात. आपल्या शरीराला नेहमीच्या आहारातूनच खनिजांचा पुरवठा होत असतो.
* कॅल्शियम — या मुळे हाडे बळकट होतात, स्नायू आकुंचन पावण्यासाठी इतर अवयव आणि मेंदू यांच्यातील संदेशवहनासाठी तसेच रक्ताच्या निर्दोष प्रवाहासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. दूध आहि दुग्धजन्य पदार्थ, हिरव्या पालेभाज्या बादाम,सूर्यफुलाच्या बिया ( सनफ्लावर) तसेच काही प्रकारच्या मास्यांमधुन शरीराला कॅल्शियमचा पुरवठा होतो.
* झिंक — रोगप्रतिकारक क्षमता कार्यरत राहण्यासाठी, जखम भरून निघण्यासाठी, शरीराच्या नियमित वाढीसाठी, झिंक आवश्यक आहे. ऑयस्टर, लाल मांस, भोपळा, व कलिंगडाच्या वाळवलेल्या बिया आणि डार्क चॉकलेट यातून तुम्हाला झिंक मिळू शकतो.
* लोह — आपल्या आहारात लोहाचे महत्व अनन्य साधारण आहे. लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते. प्रत्येक स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या मायोग्लोबीनमध्येही लोह आढळते. लोहाच्या कमतरतेमुळे,अशक्तपणा,थकवा या समस्यां निर्माण होतात. शिजवलेले सोयाबीन, मसूर पालक, काकवी, टोकू, मशरुम, सलगमचा पाला, फरसबी, यातुन भरपूर प्रमाणात लोह मिळतो.
* मॉग्नेशियम — हृदयाचे अनियमित ठोके, रक्तदाबाच्या तक्रारी, हाडांचा ठिसूळपणा, अशा समस्यां मॉंग्नेशियम चा कमतरतेमुळे निर्माण होतात. बीन्स, ब्रोकोली,टोकू, काजू, आणि रॉकेट माशातून हे भरून निघते.
* आयोडीन — आयोडीन थायरॉइड ग्रन्थि शोषून घेते. यामुळे शरीराची चयापचय क्रिया सुरळीत चालते. मेंदूच्या कार्यासाठीही आयोडीन उपयुक्त असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे गॉयटर होतो. मिठातून मोठ्याप्रमाणात आयोडीन मिळते, मासे, शिंपले, दूध, आणि दुग्ध जन्य पदार्थ, अंडी आणि आयोडीनयुक्त जमिनीत पिकविलेल्या भाज्या यातून आयोडीनचा भरपूर पुरवठा होत असतो.
(जीवन शैली ) ** आय. क्यू. वाढवा आणि तेवढेच – इ. क्यू हि वाढवा. —
सफल आणि संपन्न आयुष्य जगण्यासाठी उत्तम बौद्धिक क्षमता महत्वाची मानली जाते. म्हणून आय. क्यू. चा बोलबाला दिसतोय. परंतु केवळ आर्थिक उन्नती हेच अंतिम ध्येय नसतं,संपन्न आयुष्यासाठी इ.क्यू. म्हणजेच इमोशनल कोशँटही चांगला हवा. आपण दुसर्याच्या भावना जाणून घेतल्या तरच दुसरे आपल्या भावना जाणून घेतील आणि जगणे सुकर होईल. म्हणूनच आपली वागणूक नेहमी तपासत रहा. आपण दुसर्याचे दुःख समजून घेतो का? एखादेवेळी तरी कुणाच्या मदतीस सिद्ध होतो का? नातेसंबंधित, इतर किंवा मित्रमंडळी यांच्या वरील अडचणींमुळे व्यथित होतो का? एखाद्याची उन्नतीस मदत करतो का? हे सर्व मुद्दे तपासणे गरजेचे आहे. सध्या माणूस माणसाप्रती आपुलकी , सहानुभूती, आत्मीयता, प्रेम आदी भावना हरविताना दिसत आहे. पैशानं सर्व सुख मिळतात असं नाही. भावनेनं भरलेला हलकासा स्पर्श, किंवा दिलासा देणारे शब्द अनमोल असतात. आयुष्यात एखाद्या विशिष्ट वळणावर यशापेक्षा अशा प्रेमळसंबंधातून मिळणारे सुख हे उच्चं ठरते. म्हणूनच धकाधकीचे आयुष्य जगतानाही स्नेहगंध हिरवु देऊ नये. नातलगांची, मित्रमंडळींची, शेजाऱ्याची आवर्जून चौकशी किंवा समाचार घेणं, त्यांच्या अडीअडचणी समजूनघेन शक्य ती मदत करणं आपले कर्तव्य आहे. अडचणींची वेळ ही प्रत्येकावरच कधीना कधी येत असते. म्हणून म्हणतात ‘ पेरले तरच मिळेल ‘ .