आजची स्त्री आणि समस्यां




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

todays-women-and-problemsToday, there are many problems of women, since ancient times everyone knows that the world is being built on the sanctity of women, that is what is happening today. The world does not condemn the man, though he treats wrongly anybody. But the theory of impurity does not even have the right to go near a woman. Just as the leaves shines on the tree, same like the woman beautifies man. This article is based on  the women and there problem in this world.

आज स्त्रियांच्या समस्यां अनेकानेक आहेत, प्राचीन काळा पासूनच स्त्रीच्या पावित्र्यावर संसाराची उभारणी होत असते हे सर्वांनाच माहीत आहे, आजही तेच होत आहे. पुरुष कसाही वागला तरी जग त्याची निंदा करीत नाही. पण अपवित्रपणाच्या सावलीला सुद्धा स्त्रीच्या जवळून जाण्याचा  अधिकार नसल्याचे सिद्धांत आहे. ज्याप्रमाणे वृक्षाला पालवीने शोभा येते, शिखराला त्याच कळस शोभा आणतो, त्याच प्रमाणे स्त्री हि मनुष्याला शोभिवंत करिते. प्राचीन काळा पासून आपण पाहात आहोत स्त्री हि फक्त शृंगाराची पुतळी नसून शक्तिमान व पराक्रमाची स्फूर्ती आहे. पावित्र्याची जननी आहे.  स्त्री हि एक अनमोल रत्न आहे ती पुरुषाला पुरुष बनविते, ज्या प्रमाणे हिरा, मोती, रत्न, ह्यांना सोन्याच्या कोंदणीची अपेक्षा असते त्याच प्रमाणे स्त्रीला आश्रयाशिवाय जगताच येत नाही. जीवन पावित्र्याच्या मार्गाने नेण्यासाठी तिला पुरुष्याची गरज असते. संसार सुरळीत करण्यासाठी दोघांनाही एकमेकांची आवश्यकता असते. म्हणून पुरुष वर्गाने तिचा सन्मान राखायलाच पाहिजे. ती कुटुंब घडविते ती समाज घडविते. पुरुष कितीही उंचच असला तरी तो दुसर्या जीवास जन्म देऊ शकत नाही त्यासाठी निसर्गाने तिची निर्मिती करून त्या प्रमाणे योजना केलेली आहे. अशा या विश्वाच्या जननीस पुरुष जातीने बलात्कारासारखे अन्याय करणे बरे नव्हे.

आज ती जननीचे नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात पुरुषयांप्रमाणे कर्तव्येही बजावत आहे. शासन महिला ‘सशक्ती करणावर’ कितीतरी व्याख्यान, कार्यशाळा, शिबिरे राबवितात तसेच महिला आरोग्य सेवा, महिला आरक्षण, महिला स्त्रीभ्रूण हत्या  अशा अनेक योजनांवर सरकार चर्चाही करितात. लोकसंख्येच्या तुलनेत स्त्रियांची संख्या अर्धी आहे. परंतु आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत समाजात माणुसकीच्या दृष्टीने स्त्रियांच्या अत्याचारावर अजिबात विचार झाल्या सारखे वाटत नाही. आरोग्य, व्यक्तिमत्व, विकास याबाबतीत त्यांना सतत मागेच टाकण्यात येते.

स्वातंत्र्यानंतर कितीतरी योजनां अमलात आल्या प्रगती झाली, विकासाची शृंखला प्रत्येकाच्या दरात उभी राहिली. तरीही फरक जाणवतो एकीकडे शहारांतून व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक हव्यास असणारी स्त्री तर दुसरीकडे दारिद्र्य रेषेखाली जगणारी अनेक प्रकारच्या कौटुंबिक, सामाजिक बंधनाने जखडलेली पुरुषप्रधान संस्कृतीत दुय्य्म स्थानावर असणारी आणि अन्याय, अत्याचा, हिंसाचार, बलात्कार यामुळे जगण्याची उम्मीद हरवून बसलेली अबला दिसते आहे. यासाठी समनव्यय साधून योजनाबद्ध प्रयत्नांची आवश्यकता आहे.

जगातील एकूण कामांपैकी शहरीय असो वा ग्रामीण दोन त्रितीयांश कामे महिला करतात. परंतु त्यांची प्राप्ती एकूण उत्पादनात एक दशांश असते. भावी पिढीला घडविण्यासाठी आई म्हणून तिचीच भूमिका महत्वाची आहे तरी मग तीच अशिक्षित, दुर्बल, अन्यायग्रस्त, आणि कमजोर राहिली तर कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा विकास कसा होणार?  जगातल्या किंवा घरातल्या म्हणा वैयक्तित संपत्तीत तिचा वाटा कमीच असतो, तेव्हा दरिद्रीत राहून तिने घरातही सर्वांचा विकास कसा काय करावा? कुटुंबाच्या ख़ुशीसाठी ती कितीतरी अडचणींचा सामना करते, शारीरिक, मानसिक, व आर्थिक झिजत असते हे तिचे तिलाच कळते, सामान्य गोष्ट सांगायची ती कि सर्वसामान्य घरातील स्त्रीची पुरुषांची आर्थिक आवक किती असेल तरी पुरुषाचा व्यवहार म्हणजे तो बाहेर आपल्या व्यसनात कितीतरी पैसा उधळतो मात्र घरात स्त्रीला आर्थिक ओढाताण करण्याकरिता शारीरिक व मानसिक त्रासाला सामोरे जावेच लागते. त्यात तिची मुलावरी  व पती वरील ममता, प्रेम सामावलेले असते. पुरुष खोटे बोलून आपल्या सुखासाठी व्यसनासाठी पैसा व्यर्थ घालवू शकतो. परंतु स्त्री हि आपल्या कुटुंबासाठी सारख्या अडचणी सहन करीत असते. घरंदाज व सामान्य स्त्री हीच आपल्या आवडी-निवडींना मागे सारून आपल्या सुखाची व वेळ आली तर आरोग्याची सुद्धा पर्वा न करता कुटुंबासाठी सारखी झटत असते.

स्त्री वरील कितीतरी अत्याचार सामोरी आले गुन्हेगाराला कायद्याच्या चोकटीत फसविले परंतु अजूनही अत्याचारा चा पाऊस कमी होत नाही. हा तुम्हा, आम्हा सर्वांचाच प्रश्न आहे. यासाठी प्रत्येक महिला जागरूक असायला पाहिजे. आज गर्भजल चाचणी करून सर्रास मुलीचा जन्म नाकारल्या जात आहे. रुपया कमविण्यासाठी कानून बाजूला सारून प्रतिष्ठीत डॉ. गर्भजल चाचणी करायला तयार होतात. आणि त्यातूनही पळवाटा काढतात. त्यांना चांगलाच चोप देणे गरजेचे आहे.

आज हुंडा बळी मुळे मुलीचा जन्म म्हणजे खर्चाची बाब समजणारे आई-वडील आहेत. असा हा नकारात्मक विचार करून चालणार नाही त्यापेक्षा हुंडा मागणाऱ्या मुलां सोबत आमच्या मुली लग्नच करणार नाही, असा सकारात्मक विचार मनात ठेवून मुलीला जन्माला घालणे योग्य नाही का?  एकदा हि टोकाची भूमिका ठेवून हसत हसत मुलीला जन्म द्यावा. तिच्या जन्माचे स्वागत व्हावे. तेव्हा किती दिवस , वर्षे लागणार हा हुंडा बळी मिटण्यास ?

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा