Makar Sankranti refers both to a specific solar day in the Hindu calendar and a Hindu festival in reverence to deity Surya that is observed in January every year. Every year we celebrate Makarsankranti on 14th January or some year on 15th January depending on the Nakashatra position. This article you will to know why we celebrate Makarsankranti Festival.
सूर्य एका राशीतून दुसर्या राशीत जाणे यालाच ‘संक्रमण’ म्हणतात. आणि मकर राशीत सूर्य जाणे म्हणजेच ‘मकरसंक्रान्त’ म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीत जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दर वर्षी हिंदू लोक ‘संक्रांत’ हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. हिंदू लोकांचे सण हे चन्द्रवर्शानुसार असल्याने सध्या वापरल्या जाणार्या इंग्रजी कॅलेंडर नुसार हिंदूंचा सण हा विशिष्ट तारखेलाच येईल असे नसते. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रात मात्र संक्रात हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या १४ तारखेला साजरा करण्यात येतो. या वेळी सूर्याचे दक्षिणायन संपूण उत्तरायण सुरु होते. दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो. या वेळी थन्डी असते, त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गुळ या पदार्थांना या दिवशी फार महत्व असते. सूर्याला व देवांना तिळगुळाचा नैवद्य दाखविला जातो. सुवासिनी या दिवशी सवाष्णीला सुगडाचा वसा देतात.
सुगडाचा वसा म्हणजे लहान मडक्यातून, गव्हाच्या ओंब्या, गाजर, उसाचे तुकडे, बोर, हरभर्याचे घाटे, तिळगुळाच्या वड्या हलवा, असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदी कुंकू लावून लावून ती सुवासिनीला देतात. भारत हा शेती प्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पिकलेल्या भाज्या -धान्य वै. देवाण घेवाण व्हावी हाच उद्देश या सुगड्याच्या वाणाचा असावा. संक्रान्तिला जेवणात गुळाची पोळी वै मिष्ठान्न करण्याची पद्धत आहे