श्रम, विश्रांती, आरोग्य आणि जीवन..




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Regarding health, many people think about it still we never think about Rest after physical hard work. The only goal in front of us is to work hard to run the role of our family.  But we neglect the pain that our body needs to suffer while doing these hard work.  Work, Rest, Health and Life.Four Pillars of Happy Life. we should always think about Rest, Health and Life after your work.  This article will tell you about the importance of Work, Rest, Health and Life.

Work, Rest, Health and Life.Four Pillars of Happy Life

आरोग्या बाबत आपण अनेक विचार करतो. पण तरी सुद्धा आपण ‘शारीरिक कष्टानंतर विश्रांती’  या आरोग्या विषयक महत्वाच्या बाबी कडे पाहिजे तेवढे लक्ष देत नाही. आपल्या समोर एकच ध्येय असते  ते म्हणजे आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी अविरत कष्ट करणे. पण हे कष्ट करीत असताना आपल्या शरीराला काय काय वेदना सहन कराव्या लागतात या कडे आपण दुर्लक्ष करतो. आणि जसजसे आपले वय वाढते तेव्हा आपल्याला त्याचा त्रास प्रकर्षाने जाणवायला लागतो तेव्हा मात्र वाटते कि आपण वेळीच लक्ष दिले असते तर किती बरे झाले असते. असे मनाशी म्हणून पुन्हा संसाराचा गाडा पुढे रेटत राहतो. या त्रासामागचे प्रमुख कारण म्हणजे कष्ट किंवा काम केल्यांनतर आपण जेवढी विश्रांती घ्यायला पाहिजे ती पुरेशी घेत नाही आणि त्याचे परिणाम शरीरावर होऊन पुढे जाण्याची गती थांबून जाते. या करिता कोणत्याही कष्टाचे नंतर विश्रांती घेणे अति आवश्यक आहे.

जीवनात आपला प्रपंचाचा गाडा यथार्थरीत्या चालविण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतात, त्यासाठी आपण आरोग्य दृष्ट्या सशक्त असणे आवश्यक आहे त्या करिता चांगले आरोग्य राखण्याच्या दृष्टीने कष्ट करण्याला सुद्धा अति महत्व आहे. नुसते बसून राहण्या पेक्षा कामात असणे अधिक बरे. बसून राहणे म्हणजे रोगाला आमंत्रित करण्यासारखेच आहे. तेव्हा शरीराच्या हालचालीसाठी कष्ट करणे आवश्यक आहे. मात्र कष्ट करीत असताना कामाचा अतिरेक होऊ नये याची काळजी घ्यावी.अन्यथा त्याचा आरोग्यासार विपरीत परिणाम होऊन परत डॉ. कडे जावे लागते. व नंतर तेही सांगतात. तुम्हाला बेडरेष्ट घ्यावी लागेल. हि वेळ येऊ नये यासाठी कष्टा नंतर वेळीच विश्रांती घेणे आवश्यक आहे.

 काम तर केलेच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही. घरात काम नसेल तर सामाजिक कार्य केले पाहिजे. म्हणतात  ‘माणूस मोत्यांच्या हाराने शोभून दिसत नाही परंतु कष्टाच्या घामाच्या धारांनी शोभून दिसतो’. त्याग व परिश्रम केल्याशिवाय कोणतेही कार्य यशस्वी होत नाही.  म्हणून आरोग्यदायी जीवनासाठी कष्ट करणे फार महत्वाचे आहे. परंतु प्रकृती व स्वास्थ्याला जपून.

hard-work-hires

आरोग्याच्या दृष्टीने शारीरिक कष्टाणे आलेल्या थकव्यासाठी आपण शरीराला विश्रांती हवीच याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे आजकालच्या धकाधकीच्या जीवनात बर्याच दैंनदिन गोष्टींचा आपल्यावर ताण पडत असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक तणावा मुळे थकवा येतो. शारीरिक थकव्यासाठी शरीराला विश्रांती हि दिलीच पाहिजे. मात्र सोवतच मानसिक तणाव घालविण्यासाठी मनाला सुद्धा विश्रांती देणे गरजेचे आहे, कारण मन हे शरीररूपी यंत्राचे केंद्रस्थान आहे.

त्याला जर आपण विश्रांती दिली नाही तर त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाल्या शिवाय राहणार नाही म्हणून मानसिक तणावासाठी मनाला विश्रांती देणे गरजेचे आहे. मन शांत व प्रसन्न असेल तर आरोग्य चांगले राहील आणि मनात अशांती, राग, द्वेष असेल त्याचा परिणाम आरोग्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणूनही सर्व नियंत्रणात आणलेच पाहिजे. मनुष्याने शांतपणे  विचार करून स्थितप्रत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणतीही गोष्ट शांतीने आणि धीराने घेऊन सतर्कता बाळगली पाहिजे. तरच आपले आरोग्य चांगले राहील.

 निरोगी आरोग्यसाठी जर आपण सकाळी लवकर उठून वायुरूपी अमृताचे सेवन नित्य सेवन, नियमित व्यायाम, संतुलित आहार मनशांत, सौजन्य पूर्ण वर्तणूक ठेवणे, पुरेशी विश्रांती घेणे व नियमितपणे डॉ. कडून शरीराची तपासणी करून घेणे  इत्यादी गोष्टी नियमित आचरणात आणल्यास  निश्चितच आपले आरोग्य सुंदर, सशक्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून ”आरोग्य चांगले तर जीवन चांगले”  हि म्हण सार्थ करण्यासाठी  कष्टानंतर विश्रांती आरोग्यासाठी गरजेची आहे.  हे लक्षात घेऊ. कुठल्याही कामाचा अतिरेक होय न देता आनंदाने संसाराचा गाडा पुढे नेत चला.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu