Rang Panchami
Rang Panchami is a festival celebrated on 5th day after Holi. This is a day starts with lots of colors. Rang Panchami is hindu festival which known by the name “Dhulivandan” and “Rangapanchami”.
** धुलिवंदन
होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन हा सण साजरा करण्यात येतो या दिवशी सकाळी बाया मंडळी पाण्याची तपेली, घागरी, हंडे पाण्याने भरून पेटलेल्या होळीच्या जागी ठेवतात सूर्याच्या किरणाने व होळीच्या अग्नीने हे पाणी तापते या पाण्याने अंघोळ केली असता लाभ दायक असते. लहान मुलांना या पाण्याने अंघोळ घातल्यास त्यांना उन्हाची बाधा होत नाही असेही म्हणतात. या दिवसात कैऱ्या मिळतात,लहान मुलांना कैऱ्या उकळून त्याचा गर अंगाला लावून स्नान करून दिल्यास उन्हा पासून कुठलाही त्रास होत नाही. मोठी माणसे होळीतील राख पाणी मिसळून अंगाला लावतात व अंघोळ करतात.
** रंगपंचमी
काही ठिकाणी होळीचा दुसरा दिवस रंगपंचमी म्हणून साजरा करतात. वसंत ऋतूची चाहूल लागल्यामुळे झाडे नवीन पालवीने व विविध रंगांच्या फुलांनी भरलेली असतात व वातावरणातील हवा उष्ण, गरम झालेली असते. अशा वेळी थंड पाणी अंगावर ओतणे सुख कारक वाटते, म्हणूनच रंगपंचमी हा सण साजरा होत असावा.
कुसुंबीच्या फुलापासून काढलेल्या रंगाचे, तसेच पळस या झाडाच्या फुलापासून रंग तयार करून एकमेकांच्या अंगावर उडवितात. राज घराण्यात पेशवाईत तर हा सण शाही इतमामाने म्हणजे केशराचे पाणी करून ते एकमेकांच्या अंगावर सोडत, तसेच हत्तीणीवरून गुलाल व पिचकाऱ्या भरभरून किंवा कोरडे रंग सुद्धा उधळले जातात.
मात्र आजकाल विविध रंग बाजारात येतात त्यामुळे रंग करण्याची गरज उरली नाही. कोरडे पावडर आणून पाण्यात रंग केले जातात, किंवा रंगीत गुलाल उधळले जातात. मात्र स्त्री-पुरुषांना वा मुला-मुलींना या निमित्ताने एकमेकांची थट्टा-मस्करी करण्याची संधी मिळते. नाहीतर आजकाल एखाद्या हौदात रंग टाकून त्यातच मुले एकमेकांना डुबवितात. या प्रमाणे हसत- खेळत या सणाची मजा लुटली जाते.