The ability to focus the mind is one of the most important abilities one should possess. However, most people lack the ability to concentrate. Their attention usually wanders, without being able to fix it on one subject for any reasonable period of time. Concentration is the ability to focus the attention on one single thought or subject, excluding everything else from the field of awareness. Yog is a way of living that aims towards ‘a healthy mind in a healthy body’. Man is a physical, mental and spiritual being; yoga helps promote a balanced development of all the three. Other forms of physical exercises, like aerobics, assure only physical well-being. This article will guide how to make life successful with controlling the yog and concentration power.
इंद्रिय आकर्षणाच्या पलीकडील एकाग्रता …
प्रत्येक कार्य कुशलपूर्वक करण्यासाठी एकाग्रता महत्व पूर्ण आहे. जे हि कार्य जेवढे महत्वपूर्वक व सूक्ष्म असेल तितकीच अधिक एकाग्रता अवश्य असते. उदा. जसे एक वैज्ञाणीक परमाणु विषयक शोध कार्य करताना त्यांना उच्चं कोटीची चिरस्थायी एकाग्रतेची आवश्यकता असते, त्यांना घर-गृहस्ती, कुटुंब सर्व बाजूला ठेवून सुई च्या टोका पेक्षा सूक्ष्म व तीक्ष्ण स्वतः ची दृष्टी आपल्या शोध कार्य कल्पने वर केंद्रित करावी लागते. ती त्यांची तन्मयता व मनोयोग परमाणु वर रमलेले असते. त्या वेळी त्यांना खाणे-पिणे वेळ आल्यास स्वतः: च्या शरीराची व आरोग्याची शुद्ध नसते. यासाठी वैज्ञानिकास प्राकृतिक शक्तीची गरज असते तो त्याच शोधात असतो.
त्याच प्रमाणे आत्मा तर परा व अपरा प्रकृती पेक्षा हि सूक्ष्मतम आहे.त्यावर एकाग्रता साधण्या करिता बुद्धी तरल व स्पष्टदर्शी हवी असते. म्हणून म्हटले आहे परमात्म्यावर एकाग्र चित्त करण्याकरिता योगाभ्यास व सर्वोत्कृष्ट एकाग्रता साधण्या करिता ईशवरीय शक्तीची गरज आहे. तरच जीवन शांत, आनंदी व सुखमय होऊ शकेल.
‘ईशवरानुभूती’ हि अशीच प्राप्त होत नाही, आत्माचा वियोग परमात्म्यातून होऊनच तो देहात बसला आहे, त्यातूनच योग प्राप्त करावयाचा असतो. आपल्या पवित्र आत्म्यांचा पावन कर्ता प्रभू आहे त्याच जवळ ती औषधी आहे. तोच आपल्या आत्म्याला पवित्र करू शकतो. मनाला पवित्र करण्याचा मानस सरोवर आतला आत्माच आहे. तोच अमरनाथ होय, कुठल्याही मानस सरोवरात व अमरनाथ मध्ये जाण्याची गरज नाही. त्यास दुसरीकडे शोधणे म्हणजे त्याच्या पासून स्वतः: चा वियोग करून घेणे होय. हि चूक करू नका. तो योग ( जुळणे ) तेव्हाच शक्य आहे जेव्हा इंद्रियांच्या आकर्षणाच्या बाहेर व्हावे लागेल. ते इंद्रिय म्हणजे पाच विषय होत. १ रूप (लावण्य) २. रस (स्वाद) ३. गन्ध, ४ स्पर्श, आणि ५. शब्द.
मनुष्याची इंद्रिये त्यांच्या विषयात संपर्क आल्यास आपल्या विषयाकडे मनाला आकर्षित करतात. जसे नाक सुवासिक वासाकडे, कान त्याला जे ऐकण्यात रुची वाटत असेल तिकडेच मनाला आकर्षित करतात, याच प्रमाणे सर्व इंद्रिये त्यांच्या त्यांच्या रसात (रुचित) मनाला आकर्षित करतात.
जेव्हा मनुष्य काही काळ विषय-भोग भोगतो परंतु अल्प काळात तृप्ती करून त्याच्या वेगळा होतो. परंतु कधी कधी त्याची स्मृती त्याला त्या विषया कडे आकर्षित करीत राहते त्यातच त्याची वृक्की पक्की होऊन तो भोगी बनत जातो. शरीर म्हातारे होते परंतु तृष्णा तारुण्यात खेळत असते. त्यामुळे त्याची विषय भोगावरील शक्ती वाढत असते. व तो काम, क्रोध, लोभ, मोह या विकारांचा दास बनतो. तरी तो मूर्ख मतिमंद मनुष्य प्रार्थना करताना ‘प्रभू मी तुझा दास आहे’ असेच म्हणतो. स्वेच्छेने भोग भोगून परत प्रभूला प्रार्थना करतो ‘ देवा मला यातून सुटकारा दे ‘ याच प्रमाणे तो आदी- मध्य – अंती पर्यंत दुःख भोगत राहतो. हे इंद्रिय आकर्षण मनुष्याच्या मनाला ईशवरीय क्षेत्रात प्रवेश करू देत नाही. जागृत अवस्थेतच नव्हे तर स्वप्नी सुद्धा तो यातच गुंतलेला असतो.
रूप ( लावण्य) रुप, रंग आणि आकृती हे डोळ्यांचे विषय होत. रूपाचे सौन्दर्य, रंग, व बांधा सुंदर असला कि मनुष्याचे मन तेथेच आकर्षिले जाते. हे आकर्षण अति प्रबळ असते. ही सौन्दर्य आकृती डोळ्यापासून दूर गेली तरी आठवणीत मात्र अगदीच चिवटपणे चिकटून असते, तेव्हा स्वप्नात सुद्धा ती सुंदर सौन्दर्य किंवा वस्तू आपल्या सहवासात असल्याचे क्षणिक सुख का असोत परंतु ते सुखद दृश्य बघत असतो.
जागृत अवस्थेत तर तो त्या सुखाचा प्रयत्न करतोच. इंद्रिय ही मनाची चंचलता स्मृतीत बसवितात. रुप आणि रंग प्रकाशा शिवाय दिसू शकत नाही, विज्ञानात म्हणतात विश्वात जितक्या प्रकारचे रंग आहेत ते प्रकाशानेच बनले आहेत, अंधारात तर त्या रूप- रंगाचे काहीच महत्व नाही. म्हणजे प्रकाश हेच त्याचे माध्यम व आधार होय.
यावरून मनुष्याने समजून घ्यायला पाहिजे आपल्यात आंत असलेला अविनाशी प्रकाशमय आत्मा त्याकडे विशेष ध्यान दिले पाहिजे, तो असेतोवर शरीरात प्रकाश आहे. त्या शिवाय जीवनात अंधार हि अंधार आहे. तो शरीरातून निघून गेल्या नंतर शरीराचे शव तयार होते. त्या शवा कडे कोणीच आकर्षित होत नाही. ते मातेचे असो वा पत्नीचे असो वा अपत्य. त्या शरीराचे रूप -रंग व सुंदरता कितीही लावण्यमय असेल तरी शेवटी ती मातीच होय. कोणतीही जीवित व्यक्ती शवा कडे आकर्षिली जात नाही. आत्म- चेतना हि शरीराची घृणा करीत नसते, परंतु त्याचा दास बनत नाही, तो त्याचा आधार स्वरूप त्यात स्थित असतो. जसे सूर्य सर्व रंगांचा स्रोत आहे. आधार आहे, आपले डोळे त्याच्या आधाराने ( म्हणजे प्रकाशाने) ते रूप,रंग पाहू शकतो. अंततः आत्मा- परमात्मा परम सुंदर आहे, सुंदरताची अपार राशी परमात्मा आहे. जो परमात्मात तल्लीन होतो. त्याला सर्व संसार सुंदर दिसतो. जो शरीर कुरूप असतो त्यातही त्याला असीम सुंदरता दिसत असते.
परमपूज्य प्रकाशमय परमात्मा ची उपासना केल्यानंतर योग द्वारे सुंदरता, सौन्दर्य यांची परिभाषा लक्षात येते. दुसरे म्हणजे सुंदरता हि विचारांवर निर्भर असते, उदा एक व्यक्ती आपल्या पत्नी च्या सुंदरतेवर असीम प्रेम करतो परंतु एखादे वेळी विचारांच्या मतभेदा मुळे त्यांच्यात भांडणे तयार होऊन नंतर तो तिला डिओस देण्यास तयार होतो, त्यावेळी तो तिच्या सौन्दर्याकडे आकर्षिला जात नाही. तसेच एखादा वेष-भुषा केलेला ऋषी – मुनी असेल तर त्याला अस्सल मध्ये आपण मुनी मानत नाही.
एखादे वेळी मनुष्याची पत्नी सुंदर नसते परंतु पतीला तिच्या गुणात सुंदरता दिसत असते म्हणून ती त्यास योग्य वाटत असते, एखादी पत्नी पतीस सुंदरवाटून तिच्यावर अति प्रेम करीत असेल, परंतु तीच एखाद्या वाघा समोर किंवा अस्वला समोर गेली तर त्यांना सुंदर वाटून ते तिच्यावर प्रेम करतील काय ? ते तिला भोजन समजून खाण्यास निघतील. म्हणून सौन्दर्य बघण्याची दृष्टि त्याच्या दृष्टिकोन व विचारांवर निर्भर आहे. मनुष्याने आपले विचार सुंदर बनवायला पाहिजे, ज्याचे विचार चांगले नसेल त्याला अधिक काळं आपल्या जवळ कोणीही घेत नाही, अंततः मनुष्याचे चारीत्र्य व सदविचार यावर त्याचे सौन्दर्य निर्भर आहे.
तिसरे म्हणजे मनुष्याचे सौन्दर्य त्याच्या कर्मावर आधारित असते. ज्याचे कर्म श्रेष्ठ असेल ज्याचा व्यवहार कुशल पूर्वक व फलस्वरूप असेल, तो व्यक्ती स्वरूप-सुंदर असू शकतो. कधी म्हणतात पूर्व जन्माच्या श्रेष्ठ कर्माने मनुष्याला चांगला देह प्राप्त होतो. परंतु याही जन्मात कर्म चांगले असायला हवे. म्हणून मनुष्याने आपले कर्म श्रेष्ठ करावेत तोच खरा सौन्दर्यवान.
चौथे म्हणजे — मनुष्य देहाच्या वास्तविकता वर विचार करायला हवा. मनुष्याची वरील त्वचा रंग रूप दुसर्यास आकर्षित करतो परंतु आतं रक्त, कफ, जन्तु इत्यादी असंख्य आहेत कुठे काय थोडी जखम झाली किंवा कापले तर रक्त वाहते , सर्दी झाली कि शेंबडं वाहते, रोग होतात, त्वचा खराब होऊन फोडी, फुंसी, होऊन पस वाहतो, कधी दातातून, तर कोणत्याही अवयवांना इजा होऊन दुर्गन्धी शरीरातून येते, तर मग सुंदर त्वचा व रंग यास सुंदर म्हणता येते काय ? कधीतरी दुर्घटना होऊन अवयवांची तोड मोड होऊन अपंगत्व येते, सुंदर चेहरा विद्रुप होतो, म्हातारपणाने सुंदर चेहर्यावर सुरकुत्या येतात,
अन्न पदार्थ खाण्याने आंत विष्टा तयार होते त्यातही किटाणू तयार होतात असा हा किटाणू भरलेला शरीर आणि यावर आकर्षित होणे म्हणजे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर माशा बसण्यागत नव्हे काय ? तसेच त्यात भय, शोक,चिंता उत्पन्न होणाऱ्या अशा या विकारी शरीराला सुंदर म्हणणे कितपत योग्य ठरेल! चार दिवस सुंदर दिसणारी हि त्वचा सुंदर मानणे म्हणजे मनुष्याला अज्ञानीच म्हणावे लागेल.
म्हणून मनुष्याला ईशवरीय सौन्दर्या कडे आकर्षिले पाहिजे. ईशवरीय सौन्दर्याचे रूप लावण्या त विशेषता आहे- ती अशी १) शुद्ध ज्योतिर्मय लावण्य त्यात अन्य निकृष्टता नाही. २) त्याला जल,वायू,अग्नी,रोग यां पासून कोणतीही बाधा नाही. किंवा दुर्घटनाने अंग- भंग होण्याचे कारण नाही. ३) त्यानं काम,क्रोध,मोह, ही विकार उत्पन्न होत नाही.परंतु त्यांचे लावण्य मानव मनाला पवित्र बनवून त्यातल्या विकारांला नष्ट करणारे आहे. परमात्म्याला ‘सत्यं’,’ सुंदर’, ‘शिव’, असे कल्याणकारी म्हटले आहे, त्यांच्या सौन्दर्याकडे मनुष्याचे ध्यान गेल्यास आनंदी आनंद जीवनात प्रगट होतो.
पाचवे म्हणजे जो मनुष्य परमपिता परमात्माला सुंदर मानतो व त्याच्याशी नाते जोडतो, तो भविष्यात नराचा नारायण व स्त्री हि नारी मधून लक्ष्मी पद प्राप्त करते. ही सर्व लक्षात घेऊन व यांचे चिंतन, मनन करून प्रभूच्या आकर्षण क्षेत्रात प्रवेश करणे जरुरीचे आहे.