कॉर्नचे – स्वीट पदार्थ




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Corn Recipes :

Corn is known by us as sweet corn and there are two types of recipes which can made by sweet corn that is sweet as it’s name and spicy. Here we have various types of recipes for you. Just try this awesome recipes in your home and enjoy. Here are some delicacies dishes that every foodie should try.

Corn Recipes

कॉर्न ला स्वीट कॉर्न म्हणत असले तरी त्या पासून तिखट आणि गोड असे दोन्ही प्रकारचे पदार्थ बनविता येतात.

कच्च्या मक्याची खीर

 

साहित्य – एक वाटी कच्या मक्याचे पोहे ,पाऊण वाटी साखर, अर्धी वाटी दुधाची फेटलेली साय,  अर्धा चमचा दुधाचा मसाला, थोडे काजू- बेदाणे तळलेले तुकडे .

कृती –  मक्याचे पोहे गरम तुपात तळून घ्यावे, हाताने कुस्करून घ्यावे. उकळत्या दुधात पोह्याचा चुरा घालावा. फेटलेले साय, दुधाचा मसाला साखर व तळलेले काजू बेदाणे घालावेत. एक उकळी आणून खीर करावी. थोडा वेळ फ्रिज मध्ये थंड करून खाण्यास द्यावी.


कुरकुरीत कॉर्न टोष्ट

Corn Recipes

साहित्य – तीन ते चार मक्याची कोवळी कणसे, ब्रेड स्लाईड, थोडा बटर, दोन हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा लोणी, एक कांदा, दोन वाटी दूध, किंचित मिरे पूड, थोडी चिरलेली कोथिंबीर, टोमाँटो सॉस, चवी नुसार मीठ .

कृती- मक्याची कणसे किसणीवर किसावी, मक्याच्या किसात दूध मिसळवून वाफवून घ्यावे, फ्रायपँन मध्ये लोणी गरम करून त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची व चिरलेला कांदा परतावा,कांदा लालसर झाला कि त्यात दुधात वाफवलेला मक्याचा किस घालून परतावे, चवी नुसार मीठ आणि थोडी मिरे पूड घालावी. खाली उतरवून चिरलेली कोथिंबीर घालावी, नंतर ब्रेड स्लाईडला लोणी लावून त्याचे टोस्टर मध्ये टोस्ट करून घ्यावे. टोस्ट ला तिरका कट देऊन त्यावर मक्याचे सारण पसरवून ते टोमाँटो सॉस बरोबर खाण्यास द्यावे.


 कोर्नफ्लोअरच्या गोड पुऱ्या

Corn Recipes साहित्य –  एक वाटी कॉर्नफ्लेक्स, अर्धी वाटी मैदा, एक वाटी पिठी साखर, दोन चमचे लोणी, तळणासाठी तेल .

कृती –  कॉर्नफ्लेक्स मिक्सर मध्ये बारीक करावे, ते पिठाच्या चाळणीने चाळुन मैद्यात मिसळावे. त्यात लोणी व पिठी साखर घालून मळावे व घट्ट भिजवून गोळा करावा. थोडा वेळ मुरू द्यावेत. कढईत तेल गरम करून गँस मंद करावा. भिजवलेल्या गोळ्याच्या तीन कोणी पुऱ्या लाटाव्या व गरम तेलात सोनेरी तळून घ्याव्या.  गरम पुऱ्या छान लागतात.


मक्याचा कुर्मा

180471-3-corn_korma_step_3__DSC9149साहित्य- तीन मध्यम आकाराची कोवळी कणसे, अर्धा नारळ, लिंबा एवढा चिंचेचा कोळ, गुळ, मसाला तयार करण्यासाठी पाव चमचा मेथी,अर्धा चमचा मोहरी,थोडी हळद,पाच सुक्या मिरच्या,थोडी कोथिंबीर, ओला नारळाचा किस, जिरे, किंचित हिंग, तेल, पाणी.

कृती- कणसातील दाणे काढून कुकर मध्ये वाफवून घ्यावेत, त्याला जाड भरडून घ्यावे. काही दाणे पूर्ण राहिले तरी चालेल. मसाला वाटून घ्यावा त्यात ओल्या नारळाला सुद्धा वाटून घ्यावे. जाड बुडाच्या पातेल्यात दोन चमचे गरम करून त्यात हिंग, मोहरी, जिरे, मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी करावी नंतर हळद, वाटलेला मसाला, चवी नुसार मीठ घालावे, परतावा तो झाला कि मक्याची  भरडलेली दाणे घालावी सर्व मिश्रण घालून त्याला परतावे व थोडे पाणी घालावे. चिंचेचा कोळ गुळ,घालावा . चिरलेली कोथिंबीर, घालावी व खाण्यास द्यावी

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा