Woman + efficiency = Relationship
Woman has power to add strength to the relationship. About 90% of woman’s should be courageous to deal with without fear of storms. That situation is handled for working relationships admirably by her.
स्त्रीच्या रक्तात वेळेचे व्यवस्थापन, वित्त व्यवस्थापन, आणि नाती जोडण्याचे कसब अंगभूत आहे.
उद्योगिनी महिलांच्या आयुष्यात नेहमीच वादळे येत असतात. मात्र वादळ जसे येते तसेच जाते. उलट वादळांना न घाबरता त्याला धैर्याने सामोरे गेले पाहिजे, हा गुण 90% महिलां मध्ये असतोच.
परिस्थितीशी जोडून घेण्याची कला स्त्रियांतच असते म्हणूनच नाते जपायचे काम स्त्री उत्तम रीतीने करते.
आजची परिस्थिती लक्षात घेता नवीन पिढीला रोजगार मिळणार नाही. त्यामुळे स्वयं रोजगार म्हणजेच उद्योग- व्यवसाय संधी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येतेच. संधीचे सोने करायचे असलं तर जिद्द, कष्ट, गुणवत्ता, नावीन्य, रास्त किंमत आणि शब्द पाळणे हे गुण अति आवश्यक असतात ज्या उद्योगाची आवड असेल ती निवड अगदी दक्षतेने करता आली तर सवड हि निघतेच.व्यवसायाला वयाची अट नसते. पैशाची गरजही नसते. कमीतकमी पैशात वेळेवर उत्तम सेवा देणे. गोड वाणी गोड बोलून काम करणे यातून सेवा उद्योगाची संधी प्राप्त होऊ शकते. आलकालच्या फाष्ट लाइफ मध्ये सेवा घेण्याची व देण्याची वृत्ती फार वाढली आहे.
उदा-: ऑफिस व घर साफ करून देणारी मौसमी कर्णिक हि मॉल, हि ऑफिस या ठिकाणी माणसे पाठवून स्वच्छता करवून घेते.
कोणताही उदयोग हा वेगळ्या तर्हेने, नावीन्यपूर्ण पद्धतीने करा, तसेच गरजूंना जेवण, नास्ता देण्याची, लहान मुले सांभाळण्याची, वृद्धांना नर्सिगची सेवा देण्याचे, योगासनाचे वर्ग घेण्याची, तसेच लायब्ररी चालविणे, अश्या प्रकारे अनेक सुखसोयी पुरवण्याचा उद्योग महिला करू शकतात, लग्न समारंभातील सजावटी, रुखवन्त तयार करणे, अक्षता, वाती, गृहउद्योग मधील पापड, लोणची तयार करणे, शाळांमध्ये लागणाऱ्या गोष्टी म्हणजे खाद्य पुरविने, राख्या, फुगे, खडू, झेंडे, इ. गर्जे प्रमाणे अशी बरीच उद्योग आहेत. थोडी जाणकारी असणाऱ्या गृहिणी पासपोर्ट,व्हिसाची कामे, वृद्धांना गर्जेनुसार बँकेची कामे करण्यात मदत करणे, हॉटेल बुकिंग, पार्टीसाठी इव्हेन्ट मॉनेजमेंट करणे, मुमेंटो बनवून देणे, कुरिअर सर्व्हिस देणे, एस.एम.एस पाठविणे, बल्क-इ-मेल पाठविणे, शेअर ब्रोकर म्हणून काम करणे, सिक्युरिटी सांभाळणे, अशी बरीच उद्योग महिला करतात आणि करायला पाहिजेत. यामुळे हाती पैसा लागतो, आर्थिक परिस्थितीवर मात करता येते आणि अडचणी दूर सारून वेळेचा सदुपयोगही होतो व मनशांती लाभते.