वट पौर्णिमा




Like
Like Love Haha Wow Sad Angry
111

Vat Pournima :

Vat Pournima is a festival celebrated by women in the month of Jesht (May-June). On the day of Wat purnima, married women observe a fast for well-being and long life of their husband. It is observed in the states of Gujarat, Maharashtra, and Karnataka.

Vat Pournima

भारतातील सर्वत्र आढळणाऱ्या वृक्षांपैकी एक महत्वाचा वृक्ष म्हणजे वड. या वृक्षाशी निगडित असलेला हा सण आहे. या सणा मागची पौराणिक कथा ती अशी कि सावित्री या पुण्यवान व पतिपरायण स्त्री ने आपल्या पतीचे म्हणजेच सत्यवानाचे प्राण परत मिळविण्याकरिता प्राण घेऊन जाणार्या यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण त्यांचे कडून परत मिळविले. ज्या वुक्षा खाली सत्यवान पुन्हा जीवनात झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोमन पूजा केली.या प्रसंगाची आठवण म्हणून सुवासिनी वडाची पूजा करतात.
आपले सौभाग्य अबाधीत राहावे व जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना स्त्रिया देवाला याच दिवशी करतात. सौभाग्याचे लक्षणसलेल्या हिरव्या बांगड्या शेंदूर, बुक्का, अक्षत, फुले, काळीच गळेसरी वडाच्या पूजेत अर्पण करतात. याशिवाय कापसाची वस्त्र, अत्तर, कापूर, पंचामृत, नवे वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गुळ, खोबरा ह्याचा नैवेद्य करून प्रथम सुपारीच्या गणपतीची स्थापणा वडा जवळ करून त्याची शेंदूर, दुर्वा वाहून पूजा करतात. वडाच्या बुंध्याला सुत गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालतात व मनोमन पतीच्या आयुष्याची मागणी घालतात. या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात. सुवासिनीला हळद-कुंकू लावून आंबे, गहूची ची ओटी भारतात. असा हा सुवासिनींचा सण आहे .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
111




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा