Types of Poha :
Poha is a very famous dish. this recipe is generally used for breakfast. in this post we will see types of bitten rice.
** दूध पोहे –
साहित्य – एक वाटी पोहे, दोन कप दूध, आवडी नुसार साखर, थोडी वेलची पूड.
कृती- पोहे धुवून निथळत ठेवावे, दूध गरम करून घ्यावे. भांड्यात दूध, पोहे, साखर व वेलची पूड घालून हळुवार एकत्रित करून खाण्यास द्यावे.
** दही पोहे-
साहित्य – एक वाटी पोहे. दिड वाटी गोडं दही,एक हिरवी मिरची, चवी नुसार मीठ, एक चमचा साखर, फोडणी साठी तेल, हिंग, मोहरी, कढीपत्ता.
कृती – पोहे धुवून निथळत ठेवावे, पाणी न घालताच दही घुसळून घ्यावे. तेलात हिंग, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी. ती पोह्यावर घालावी, साखर, मीठ, बारीक चिरून हिरवी मिरची पोह्यात घालावी. वरून दही घालावे व चहुवार सर्व मिक्स करून घ्यावे.
** गुळ पोहे
साहित्य – एक वाटी पोहे, नारळाचा चव आणि गुळ.
कृती – पोहे धुवून निथळत ठेवावे, नारळाच्या चवात गुळ अगदी बारीक किसून घालून मिसळून घ्यावा आणि पोह्यात मिसळून घ्यावा.
** सातोळे पोहे
साहित्य – नारळाचे दूध, गुळ, वेलचीपूड, पोहे आणि हळदीची पाने.
कृती – नारळाच्या दुधात गुळ बारीक करून व वेलची पूड मिळवून ठेवावी, म्हणजे गुळ दुधात पूर्ण पणे मिसळायला हवा. पोहे धुवून निथळत ठेवावेत. नारळाच्या दुधात एक किंवा दोन हळदीची पाने टाकावीत व ते दूध कोमटसर गरम करावे. व थंड झाल्यावर त्यात पोहे टाकावे. या पोह्यांना किंचित हळदीचा सुंदरसा वास येतो.
** साधे पोहे
आपण नेहमी करतो तेच कांदे पोहे परंतु त्यात कांदे न घालता नारळाचे पाणी घालून पोहे करावेत.