श्रीमद भगवद गीता सार …




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Shreemad Bhagwad Geeta Saar :

The Bhagavad Gita is the essence of the Vedas and Upanishads. It is a general sacred text relevant to individuals of all demeanors, for all circumstances.

Shreemad Bhagwat Geeta Saar

गीता म्हणजे वैदिक विद्देचे सार (औषध) आहे. आपणाला एक विशिष्ट औषध पाहिजे असल्यास आपण औषध पात्रावर जे लेबल असेल त्यांत लिहिलेल्या आदेशा नुसार आपण क्रिया करितो. आपल्या मतानुसार किंवा एखाद्या  मित्राच्या सल्ल्यानुसार औषध घेत नाही. ते डॉ. किंवा लेबलवर लिहिल्या प्रमाणे ते घेतो. त्याच प्रमाणे भगवतगीतेच्या प्रवक्त्याने स्वत: हि भगवत गीता जशी सांगितली आहे त्याच प्रमाणे किंवा त्या आदेशाप्रमाणे स्वीकारली पाहिजे. भगवान या शब्दाचा अर्थ एखाद्या शक्तिशाली महापुरुष किंवा एखादी देवता असा केला जातो. आणि गीतेत निश्चितच भगवान या शब्दावरून श्री कृष्ण हे एक महा पुरुष आहे हे स्पष्ट होते. श्रीकृष्ण हे एक आदिपुरुष आहेत. महान आचार्यांनी आणि वैदिक विद्देतील भारतातील अनेक अधिकारी व्यक्तिंनी या सत्याला मान्यता दिली आहे. भगवत गीता हि प्रथम त्यांनी सूर्य देवाला , सूर्य देवाने मनुला, व मनुने इक्ष्वाकुला सांगितली आहे. या प्रमाणे परंपरेने प्राप्त झालेली हि योग पद्धती एका प्रवक्त्याकडून दुस ऱ्या प्रवक्त्याकडे चालत आलेली आहे. परंतु कालांतराने ती लुप्तप्राय झाल्या सारखीच होती. हि विचारमालिका पुन्हा नव्याने स्थापित करण्याची भगवंतांची इच्छा होती म्हणून त्यांनी त्यांच्या साक्षात शिष्य जिवलग सखा, भक्त अर्जुन यांस ती कुरुक्षेत्रात सांगितली.

 

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu