परकीय भाषा आणि करिअर




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Foreign language and career : 

As the world turns out to be increasingly a worldwide or global village. Foreign language experts with a good understanding of cultures are in great demand in the corporate world. This can be a good opportunity for you to begin your profession as an interpreter.

Foreign language and career

युवा म्हटले कि महिला असो वा पुरुष असो पदवीधर झाले कि प्रत्येकाची एक महत्वाकांक्षा असतेच कि नौकरी करावी आणि स्वावलंबी व्हावे. आणि पुरुषाला तर ती आवश्यकच आहे. तेव्हा नोकरी शोधायची आणि आपल्या कुटुंबाचा भार सांभाळायची वेळ प्रत्येकावर कधीना-कधी येतेच. तेव्हा नोकरी  कोणत्याहि जिल्हा किंवा परदेशात सुद्धा लागू शकते. परकीय भाषेचे सम्पूर्ण ज्ञान जर असेल तर त्याच्या बळावर मोठमोठे पदभार तर सांभाळता येतात व पगारही भरपूर पदरी पडू शकतो.

आजच्या तरुण पिढीला परदेशी भाषा शिकण्याची इच्छा देखील असते.  हल्ली तर शहराशहरात अनेक संस्था परदेशी भाषा शिकविण्याचे वर्ग चालवितात. हि एक छन्द  म्हणून शिकायची नसते. हि आपल्या पुढल्या नोकरी वा करिअर साठी गरजेची आहे हे निश्चित. आपल्या भारतात सुद्धा विविध ठिकाणी संस्था व विश्वविद्यालये हे वर्ग चालवतात.

बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो कि हि भाषा शिकून करायचे तरी काय? परंतु हा एक व्यवसायाचाच भाग आहे. बऱ्याच  परदेशी संस्था व्यवसायाची अनेक दालने उघडून तुमचे स्वागत करायला सज्ज आहे.  परदेशी भाषा शिकल्यानंतर कोणता व्यवसाय किंवा नोकरी करायची याचा वेध आपणच घ्यायचा.

जसे उदा : – शिक्षक — हा सर्वात प्रचलित व्यवसाय आहे.  हल्ली गावोगावी जाऊन सुद्धा परदेशी भाषा शिकवण्याचे वर्ग चालताना दिसतात.  अनेक शाळा देखील परदेशी भाषांचा सामावेश अभ्यास क्रमात सामावेश करून घेतात. अनेक छोट्यामोठ्या कंपंन्या ज्याचे काही काम परदेशात असते त्यांना फक्त भाषा तज्ञानची गरज नसते. अश्या वेळेस त्यांच्या कम्पनीतील अनुभवी लोकांना वापरात असलेली चाली रीतींची भाषा शिकवली जाते. ह्या सगळ्यांना शिकविण्यासाठी मात्र भाषा तज्ञानची गरज असते.

शाळा, कॉलेज, विद्यापीठ किंवा खाजगी वर्ग अशा वेगवेगळ्या ठिकाणी भाषा शिकविण्याचे काम मात्र भाषा तज्ञ करू शकतात.

दुभाषी होण्यासाठी भाषेची आणि त्या देशाची खगोल माहिती असणे अत्यंत महत्वाचे असते आणि त्याच बरोबर ज्या विषयाची चर्चा होणार आहे त्या विषयाची सखोल जण असणे महत्वाचे असते. परंतु दुभाषांचा व्यवसाय अत्यन्त संवेदनशील व्यवसाय मानल्या जातो. आणि फार कमी भाषा तज्ञा या क्षेत्रात येतात.

* अनुवादक : प्रत्येक देशाला साहित्याची एक परंपरा असतेच.त्याची संस्कृती दाखवणारे, जणमाणसाचे जीवन दाखविणारे साहित्य असते. अश्या प्रगल्भ साहित्याचा अनुवाद आपल्या भाषेत जर केला तर अनेकांना भाषांतरित साहित्याचा लाभ घेता येतो.

* सरकारी नोकऱ्या : परदेशी भाषेच्या जाणकारांना सरकारात अनेक नोकऱ्या उपलब्ध आहेत. सर्वात जास्त  मान, पैसे मिळवून देणारी नोकरी गुप्तसेवा विभागात असते.

ज्याला आपण intelligence service असे म्हणतो. परदेशी भाषा तज्ञानची फार गरज असते.  ह्या नोकरी साठी काही विशिष्ट परीक्षा द्याव्या लागतात. अनेकदा ह्या सरकारी भाषा तज्ञाची नियुक्ती परदेशातल्या भारतीय दूतावासात होऊ शकते. या सरकारी नोकऱ्या मध्येसुद्धा भाषा तज्ञाचे विविध विभाग असतात. ते voice deciphering cryptology इ. अनेक क्षेत्रात काम करू शकतात.

** पर्यटन : परदेशी भाषा जाणकारांची पर्यटनाच्या क्षेत्रात खूप गरज असते. बाहेरील देशातील पर्यटक जेव्हा भारतात येतात तेव्हा अनेकदा त्या पर्यटकांना  त्यांची मातृभाषा बोलणारा गाईड हवा असतो.  अशा वेळेस जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॉनिश, चिनी, जपणॆशा अनेक परदेशी भाषा बोलणाऱ्या गाईडची गरज असते. परदेशात व्यवसाय करण्यासाठी सुद्धा स्थानिक भाषेची गरज असते.

** प्रशासकीय सेवा :  आज प्रशासकीय सेवांसाठी ज्या परीक्षा असतात त्यात सुद्धा अनेक परदेशी भाषांचा सामावेश केलेला आहे. या परीक्षा उत्तीर्ण  होऊन i  f s . ( इंडियन, फॉरेन सर्व्हिसेस ) मध्ये नोकरी मिळू शकते. या क्षेत्रातील लोक पुढे परदेशातल्या भारतीय दूतावासात भारताचे राजदूत म्हणून किंवा भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात.

** बहुराष्ट्रीय कंम्पन्या : भारतीय कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये अनेक नवीन प्रकल्प तयार होत आहे. कपड्या पासून ते अगदी कॉम्प्युटर पर्यंत अनेक गोष्टींची आयात -निर्यात होत असते. त्याच बरोबर सॉफ्ट स्किल्सचीही देवाण-घेवाण सुरु असते. अशा कंपन्या मध्ये त्या देशातल्या लोकांबरोबर संवाद साधण्यासाठी भाषा तज्ञाची गरज  असते. हे जाणकार महत्वाच्या वाटाघाटींची बोलणी करण्यासाठी प्रदेशांत जातात  आज असंख्य भारतीय कंपन्या अशा भाषा तज्ञाच्या शोधात आहेत. या वरुन लक्षात येते कि हौस किंवा छन्द म्हणून परदेशी भाषा शिकावी कां ?

परदेशी भाषांचे ज्ञान नोकरी आणि करिअरचे अनेक पर्याय देते . भाषेचे ज्ञान म्हणजे  फक्त भाषा बोलणे नव्हे  ती भाषा मनापासून आवडली पाहिजे. त्यातील कंगोरे कळले पाहिजे, जी भाषा शिकावयाचीं आहे तिथल्या लोकां विषयी त्या देशा विषयी माहिती सुद्धा असली पाहिजे. भाषा लिहिता व वाचता आली पाहिजे. प्रत्येक भाषा हि सुंदर असते, ती मनापासून आत्मसात केली तर ती भाषाच तुम्हाला अनेक संधी उपलब्ध करून देईल. हे निश्चित. तेव्हा शिका आणि करिअर करा तुमचे आणि देशाचे सुद्धा !

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu