भगवद गीता सार
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Bhagwad Geeta Saar :

The Bhagavad Gita is the essence of the Vedas and Upanishads. It is a general sacred text relevant to individuals of all demeanors, for all circumstances.

Bhagwad Geeta Saar  भौतिक प्रकृति हि काय आहे ?  प्रकृति एक ‘परा’ दुसरी ‘अपरा’  परंतु ह्या दोन्हीचा नियंत्रक भगवंत आहे. सत्व, रज, तम, अशी त्रिगुणात्मिका प्रकृति आहे. या त्रिविध गुणांच्या पलीकडे शाश्वत  ”काल” तत्व आहे. या त्रिगुणांच्या एकत्रीकरणामुळे आणि शाश्वत काल तत्वाच्या नियंत्रण व देखरेखीखाली सर्व कर्मे चालतात आणि आपण त्या कर्मामुळे सुख-दु:खे भोगतो. याला  ”कर्म तत्वे” म्हणतात.

ईश्वर, जीव, प्रकृति, शाश्वत काल आणि कर्म या पाच तत्वांपैकी  ईश्वर, जीव, प्रकृति आणि काल हि तत्वे नित्य आहे. प्रकृतीची अभिव्यक्ती ठराविक अंतराने होत असते नंतर काही काळ ती टिकून राहते व नंतर अदृश्य होते. अशी हि प्रकृतीची कार्ये सुरूच असतात. म्हणून प्रकृति नित्य आहे मिथ्थ्या नाही. भगवंत प्रकृतीला ”माझी प्रकृति ” असे म्हणतात. हि त्यांची वेगळीच शक्ती आहे.   त्याच प्रमाणे जीव सुद्धा त्यांचीच शक्ती आहे. जिवाचा भगवंताशी नित्य संबंध आहे. तसेच या  तत्वांचा एकमेकांशी संबंध आहे. परंतु पाचवे तत्व कर्म हे नित्य नाही. कर्माची फळे तात्काळ नसून पुरातन असू शकतात. आपण अनादी काळापासून कर्माची फळे ( सुख-दु:ख ) भोगीत असतो. परंतु आपण या कर्मफळात बदल घडून आणू शकतो. परंतु हा बदल आपल्या ज्ञानाच्या पूर्णतेवर अवलंबून आहे. आपल्या या सर्व कर्मांच्या फळांपासून मुक्त होण्याकरीता आपण कोणत्या प्रकारची कर्मे करावी हेच आपल्याला माहित नसते.

जीव आणि ईश्वर हे चेतन आहेत. जीव हा आपल्या विशिष्ट शरीराचा ज्ञांता आहे. मात्र भगवंत हा संपूर्ण शरीराचा ज्ञांता आहे. हा सर्व व्यापी आहे, हा प्रत्येक  जीवांच्या हृदयांत असतो. आणि म्हणूनच भगवंताला त्या प्रत्येक जिवाच्या मानसिक हालचालिंचे ज्ञान असते. तो जिवाला त्याच्या इच्छे प्रमाणे जेव्हा जीव सद्गुणी होतो, स्थिरचित्त होतो आणि आपम कोणती कर्मे करावी हे त्याला समजते, तेव्हा त्याच्या कर्माच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. यावरुन हे सिद्ध होते कि कर्म हे शाश्वत म्हणजे नित्य नसते. बाकी चार तत्वे नित्य व कर्म हे नित्य नाही.

भगवंताची चेतना व जीवाची चेतना हि फार दिव्य आहे. मात्र प्राकृतिक परिस्थितीच्या किंवा मायेच्या आवरणामुळे चेतना विकृत स्वरूपात प्रतिबिंबित होऊ शकते. परंतु भगवंताच्या चेतनेवर प्राकृतिक परिस्थिती किंवा माया आवरण घालू शकत नाही. ते भौतिक विश्वात अवतरीत होतील तरी त्यांची चेतना मायेने आवृत्त होत नाही. भगवंतावर  मायेचे आवरण असते तर भगवद गीतेत त्यांनी ज्या दिव्य गोष्टी सांगितल्या आहे त्या सांगता आल्याच नसत्या.  मायेच्या आवरणातून चेतना मुक्त झाल्या वाचून कोणालाही दिव्य विश्वाविषयी काहीच सांगता येत नाही. भगवंत हे मायेच्या दोषांतून नित्य मुक्त आहेत. तेव्हा आपण सुद्धा या मायेने दुषित झालेल्या चेतनेला शुद्ध केले पाहिजे. जेव्हा आपली चेतना शुद्ध होते तेव्हा आपली कर्मे ईश्वराच्या ईच्छा पुर्तीला अनुकूल अशी होतात. आणि त्यामुळे आपण सुखी होतो.

जेव्हा आपण  मायेने दुषित झालेलो असतो त्याला बुद्धजीवी म्हटले जाते. हा मिथ्थ्या अहंकार होय.

मनुष्याने देहात्म बुद्धीतून मुक्त झालेच पाहिजे. प्राकृत जगात चेतनेवर आलेल्या मलीन्यातून मुक्त होणे आणि शुद्ध चेतनेच्या स्वरूपात परत येणे याला मुक्ती म्हणतात. भगदगीतेच्या शिकवणीचा हाच उद्देश आहे. शुद्ध चेतना जागृत करणे. शुद्ध चेतना म्हणजे भगवंताच्या आज्ञेचे पालन करणे.

चेतना म्हणजे काय आहे? चेतना म्हणजे ” मी आहे”  तर मग  ‘मी कोण आहे’? चेतनेवर जेव्हा मायेचे आवरण असते तेव्हा ”मी आहे ” याचा अर्थ ‘ मी सर्वात मोठा ‘प्रभू ‘आहें.  मीच भोक्ता आणि मीच निर्माता आहे. जगाचे चक्र फिरत राहते , कारण प्रत्येक जिवाला वाटते कि मी भौतिक जगाचा प्रभू आणि निर्माता आहे. या मायेने आवृत्त झालेल्या चेतनेचे दोन मनोवैज्ञांनिक विभाग आहेत. एक असा कि ”मी निर्माता आहे.” आणि दुसरा ” मी भोक्ता आहे.” वास्तविक भगवंत निर्माता किंवा स्रष्टा आणि भोक्ता आहे. आणि जीव हा भगवंताचा अंश असल्यामुळे तो निर्माता किंवा स्रष्टा नाही. आणि भोक्ता हि नाही. तर जीव भगवंताचा सहयोगी मात्र आहे. तो निर्मित आहे. आणि तो स्वत: भोगला जातो. उदा: यंत्राचा एक भाग संबंध यंत्राशी सहकार्य करतो. तसाच शरीराचा एक अवयव सं बं ध शरीराशी सहकार्य करतो हात पाय,डोळे, मांड्या, पोटर्या,घोटे ई. सारे शरीराचे भाग वास्तविक ते भोक्ते नाहीत, भोक्ता पोट आहे, पाय चालतात,  हाताने भोजन करता येते, दात चर्वण करतात, याच प्रमाणे शरीराचे सर्व अवयव उदराच्या संतोषाकरीता काम करतात कारण शरीराच्या रचनेचे पोषण करणारे उदर हे प्रमुख अंग आहें म्हणून प्रत्येक भोज्य पदार्थ पोटाला दिला जातो, ज्या प्रमाणे मुळाला पाणी घातल्याने संपूर्ण वृक्षाचे पोषण होते.व शरीराचे पोषण होण्या करीता पोटाला भोजन द्यायचे असते.

त्याच प्रमाणे भगवंत भोक्ता आणि स्त्रष्टा आहे, भगवंताच्या अधीन असणार्या आपण जीवांनी भगवंताच्या संतोषार्थ सहयोग केला पाहिजे. आपण भगवंताशी केलेला सहयोग आपणा जीवांच्या हिता करिताच असतो. परमेश्वर आणि जीव यांचा एकमेकांशी सं बं धसुद्धा स्वामी-सेवक  यांच्यातील सं बं धा प्रमाणेच असतो. जर स्वामी- संतुष्ट असेल तरच सेवक संतुष्ट राहील. अभिव्यक्त झालेले विश्व ज्यांनी निर्माण केले त्या परमेश्वराच्या ठिकाणी निर्मितीची आणि भोक्तेपणाची प्रवृत्ती असल्यामुळे जीवांच्या ठिकाणी सुद्धा जरी यांप्रवृत्ती आहे तरी परमेश्वराला प्रसन्न करण्यातच जीवांचे कल्याण आहे. भगवंत पूर्ण परतत्व परब्रम्ह आहे.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d