भगवान शिव पूजा




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Bhagvan Shiv Pooja :

This article is about lord Shiva who is one of the principal deities of Hinduism. This article tell you the real meaning of “OM”.

Bhagvan Shiv Pooja :

शास्त्राच्या मान्यतेनुसार तैतिस कोटी देवता त्रिमूर्ती ब्रम्हा, विष्णू आणि शिवाचे विस्तारित रूप आहे. या तीन मूर्तीच्या शक्ती समोर कोणतीही शक्ती नाही. सृष्टीचे स्थापनाकारी ब्रम्हा, पालनकारी विष्णू आणि प्रलयंकारी शिव सुद्धा आपापल्या रूपात, कार्यात गुरु आहे.

परंतु || गुरुर्र ब्रम्हा, गुरुर्र विष्णू, गुरुर्र देवो महेश्वरा || या श्लोकानुसार साक्षात गुरु म्हणजे गुरूंचे हि गुरु आणि तिन्ही मूर्तींचे गुरूं ‘परब्रम्ह’ ला नमन करण्याची गोष्ट येते  आता परब्रम्ह गुरु कोण आहे?

या परमशक्तीला जाणून घेण्यासाठी काही समजून घेणे अत्यन्त आवश्यक आहे.

ओम = अ +उ + म = ओम याचा अर्थ …. हिंदूंच्या मान्यतेनुसार संपूर्ण जण संख्या तीन भागात विभागलेली आहे. ब्रम्हाला मानणारे ब्रम्हसमाजी, विष्णू ला मानणारे वैष्णव संप्रदाय आणि शिवाला मानणारे शैव किंवा रुद्र संप्रदाय परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे कि स्वतःला: सांप्रदायातील विभिन्नतेच्या कारणास्तव वेगळे मानणारे संपूर्ण मनुष्य आत्म्यामध्ये ब्रम्हा, विष्णू आणि शिव या तिघांची कार्यकुशलता आपणात पूर्ण: आहे हे समजून घ्यायला पाहिजे. जन्म देण्याची शक्ती, पालनपोषणाची क्षमता आणि विनाशाची शक्ती हे त्रिमूर्तीचे प्रमुख गुणपर्यटक आत्म्यात त्या त्या शक्तीनुसार असतेच म्हणूनच आत्म्याला त्रिमूर्तीचे प्रतीक ‘अउम’ या शब्दाने संबोधित करतात . या शब्दानेच ओम हा शब्द बनतो. ओम  म्हणजेच ब्रम्हाचा ‘अ’ विष्णूचा ‘उ’ आणि महेश चा ‘म’  यात अजून एक रहस्य समजून घेणे म्हणजे ” ओंकार” चा अर्थ म्हणजे ‘अ’ ‘उ’ ‘म’ चे कार्य म्हणजे अ ब्रम्हाचे स्थापनेचे कार्य, ‘उ’ = विष्णूचे पालनाचे कार्य आणि ‘म’ महेशचे विनाशाचे कार्य या तिन्ही कार्याचा नाश परस्पर जोडले गेले आहे. या तिन्ही मूर्त्यांना जोडणारी शक्ती आणि त्यांच्या कार्याला कल्याणकारी स्वरूपात जोडणारी शक्ती म्हणजेच ‘परमशक्ती’ होय. हि शक्ती कोण आहे?

हि परमशक्ती परमपिता परमात्मा निराकार शिव आहे. परंतु शिव म्हणजे महेश नाही.  महेश हे देवता आहे ‘शिव’ परमपिता परमात्मा आहे. परमपिता परमात्मा आणि देवात्म्यांमध्ये बरेच अंतर आहे. आज पर्यंत आपण वेदशास्त्रांमध्ये आणि पुराणात देखील शिव शंकर हे नाव ऐकतो नेहमीच शिवाचे नाव समोर व शंकराचे नाव मागे असते. शंकर शिव कधीच नसते. हेच सदैव शिवलिंग म्हणतात, शंकरलिंग कधीच म्हणत नाही. याचे काय कारण असेल ?

शंकरायला कधीही ध्यानस्त बसलेले दाखवतात मग ते कुणाच्या समरणात लिन झालेले असतात?

या सर्व प्रश्नां मुळे हि गोष्ट स्पष्ट आहे कि  शिव शब्दाला वेदात, शास्त्रात आणि इतर पुराणात शंकर या शब्दापेक्षा अधिक महत्व दिले गेले आहे. आणि याला अधिक स्पष्ट करण्यासाठी गीतेत एक श्लोक सुद्धा आलेला आहे. –

                             काक्षतं :कर्मणा सिद्धी यजन्त इह देवता: |

                             क्षिप्रम हि मानुषें लोके सिद्धीर्भवती कर्मजा ||2 ||   अध्याय चार ||

जो मनुष्य या मृत्यूलोकात कर्माच्या मोबदल्यात फळाची अपेक्षा ठेऊन देवतांची पूजा करतो आणि त्यांच्या कर्मातून लवकरच प्राप्ती होते. पण अशा लोकांना माझी प्राप्ती होत नाही म्हणूनच तू माझेच सर्व प्रकारे माझीच पूजा करं देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात. देवता हे वेगळे आहेत आणि परमपिता परमात्मा ची उपासना करणारे परमपिता परमात्मालाच प्राप्त होतात.

ब्रम्हा, विष्णू, महेश हे सुद्धा देवता आहेत, शंकर सुद्धा देवांचे देव महादेव आहेत परंतु परब्रम्ह परमशक्ती नाही. शंकराचा गुरु सुद्धा परब्रम्ह शिव आहे आणि ते त्याचीच उपासना करतात. देवतांच्या आधी परमपिता परमात्मा आहे. शंकराच्या आधी शिव हे नाव येते म्हणून शिव-शंकर म्हणतात. त्रिमूर्तीचे रचीयता शिव आहेत. ब्रम्हा, विष्णू, महेश हे कार्य प्रणाली चे माध्यम आहे. आपणात परमपिता परमात्म्याची स्थापना ब्रम्हा द्वारे पालन विष्णू द्वारे व विनाश शंकरा द्वारे होत असते.

म्हणूनच ‘ शिव परमात्माय नमो’ म्हटले जाते. हे समजण्या योग्य ( परमात्मा  विष्णू रूपाने)

पाच तत्वांचा पुतळा ,पालनपोषण करणारा आणि शंकरा द्वारे रौद्र रूप धारण करून संहार करणारा तसेच ब्रम्ह रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. या शक्तीचा रचियता परमपिता ‘शिव’ म्हणूनच शिवाला सर्व मनुष्य आहि समस्त देवी देवता उपासना करतात. शिवाचेच घ्यान शिवशंकर सुद्धा लावतात. हेच ते कारण होय कि शिव शंकर नेहमी घ्यानस्त असतात. ‘ओम नमःशिवाय: ‘

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा