Sant Sangati Ani Satsang :
A saint, also known as a hallow, is a person who is recognized as having an exceptional degree of holiness or likeness to God. This article tells us about Sant and Satsang. This blog is basically for Saint fellowship and Satsang. read full blog on Marathi Unlimited.
संतांच्या चारित्र्याकडे पाहताना आपणास फक्त चमत्कार पाह्ण्याचीच जास्त आवड असते आणि कौतुकही असते. परंतु त्याचा विश्वात्मक भाव मात्र आपण जाणत नाही. त्यांनी सांगितलेला आचार, विचार उद्देश जाणत नसून त्यांनी केलेल्या उपदेशाचे कडे सोईस्करपणे दुर्लक्ष करून हेतू लक्ष्य न घेता पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना आपल्या आयुष्यात सुखाऐवजी दु;खच वाट्याला येते.
ते तर जगाला दु;खापासून मुक्त करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात. मात्र आपण त्यांच्या सांगण्याचा मागावाचं लक्षात घेत नाही. संत समाजाचा, मानवतेचा आणि निसर्गाचा सुद्धा विचार करतात. मानवाच्या विकासासाठी निसर्गाची साथ किती महत्वाची आहे. निसर्गाचे जीवनाशी किती निगडित नाते आहे. हे संत तुकोबांनी आपणास समजविण्याचा प्रयत्न केला. या प्रमाणे मन्त्र दिला.
”वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरें ”
ते म्हणतात-केवळ ईश्वर भक्तीतच अडकून न पडता संसारा बरोबर परमार्थ शक्य असल्याचेच सांगतात. आयुष्यात आनंद प्राप्त करायचा आणि दु;खापासून सुटका करून घ्यायची असल्यास ते म्हणतात –
”जोडोनिया धन उत्तम वेव्हारें | उदास विचारें वेच करी ||
उत्तमची गती तो एक पावेल | उत्तम भोगील जीवखाणी ||
तुका म्हणे — करावे स्वहित !
अभांगाची ओळी — – अन्नाच्या परिमळें जरी जाय भूक |
तरी कां हे पाक घरोघरी ||
आपण अन्न शिजवितो त्याला स्वाद येतो. त्याचा सुगन्ध दरवळतो.परंतु यांच्या वासाने पोटाची भुकेची शांती होत नाही. तसे जर असते तर घरोघरी स्वयंपाक झाला नसता, तेव्हा आपले खरे हित कशात आहे हे जाणा त्यासाठी नित्य देवाचे नाम घ्या. जसे फक्त पाण्या कडे पाहून तहान भागात नाही, त्यासाठी पाणी प्यावे लागते, पाण्याची साठवण करावीच लागते. केवळ झाडाची सावली पाहून विसावा मिळत नाही त्यासाठी झाडाच्या सावलीत बसावे लागते. तेव्हा त्या सावलीत खरा विसावा मिळतो. त्याचप्रमाणे चित्तात परमेश्वराबद्दल दृढ भाव ठेवावा त्यानेच मुक्ती मिळेल. केवळ जाणीव किंवा ज्ञान ठवल्याने मनुष्याचे अंतिम कल्याण होत नाही. त्याला भावपूर्ण कृतीची जोड आवश्यक असते. जीवन हा केवळ जाणिवेचा विषय नाही तर तो अनुभवाचा उपक्रम आहे. कोणत्याही गोष्टीचा केवळ विचार करून चालत नाही. तर त्या विचाराला कृतीची जोड हवी. तसेच चिंतनाला अनुभूतीचा आधार हवा. अर्थात- आधी माणसाच्या मनात संबंधित विषया बद्दल भाव, भावना हव्यात आणि त्या कृतीत उतरायला हव्या विचाराला कृतीची जोड नाही तर ते स्वप्नच ठरेल.