Raj Marga-
This is a marathi adhyatma. It includes The principle of self. A kind of Maturity. “Spiritual; soul.” The inner, spiritual self or spirit. Live the Spiritual Life. Spirituality is the Best Part of life. Read Full article in Marathi.
सर्वगुण संपन्न असा मानव तयार करण्यामागे ईश्वराचा विशिष्ट असा हेतू असला पाहिजे. इतर सजीवांमध्ये नसलेली बौद्धिक व भावनिक विचारशिलता फक्त मानवालाच देऊन त्याच जीवन विकास घडवून आणण्याचा सृष्टीसर्जकांचा हेतू ईदात्त आहे. मन आणि बुद्धी या शक्तीच्या जोरावर हृदयात कोमलता बुद्धीत प्रखर तेजस्विता आणि मनात परोपकाराचा सुगन्ध दरवळत ठेवला कि मानवी जीवनाचे सार्थक होईल. बुद्धीच्या बळावर जगाचे शासन चालविण्यासाठी बुद्धीला सकस विचारांची जोड हवी त्यामुळे दृष्टिकोन बदलतो. श्रद्धा व भावना डोळस बनतात आणि त्यातूनच मानवी उत्कर्ष साधला जातो. बुद्धिवादाच्या भ्रामक कल्पना बाळगून आणि कर्तव्याचा अहंकार बाळगून खर्या जीवन उत्कर्षाचे ध्येय प्राप्त होणार नाही. बुद्धीच्या गर्भात निपजणारा विचारच मनाला संस्कारी आणि संवेदशील व प्रतिकारक्षम बनवितो, आणि मानसिक दृढता प्राप्त करून देतो. मन व बुद्धी हे शरीराचे चालक व वाहक आहेत. त्यांची पारदर्शी वृत्ती व जीवनतपणाचं जीवन विकासाचा मार्ग प्रशस्त करू शकतो. भौतिक जीवनात रममाण होणारी व्यक्ती मन, बुद्धीच्या जडण,घडण याकडे दुर्लक्ष करीत असते.
मनातिल संकल्पनांचा आणि विचारांचा जीवनाच्या उन्नतित मोठा वाटा असतो आपले लक्ष काय आहे याप्रती सतत जागरूकता असावी. आणि यासाठी जीवनातील निराशा दूर करावी. हि क्रिया विवेक बुद्धीच्या जोरावर सहज पार करता येते. त्याकरिता मात्र मनाची निग्रही वृत्ती लागते. !
जीवनकल्याणाची अभिलाषा मनात सतत असावी. त्याकरिता श्रेष्ठ , महात्मे यांचा तेजपुंज संदेश आचरणात आणला पाहिजे. विज्ञान तंत्रज्ञान यांच्या प्रगतीबरोबरच मानवधर्म लक्षात असायला हवा. आणि आपल्यात कृतज्ञा बाळगावी. सुख-दुःखात धैर्यशील आणि आश्व्स्त असावे.
लाचारी, शुद्रता,निस्तेजता, आणि असंतुष्टी, अस्वस्थता हे मनातहि आणू नये. आपली अस्मिता,स्वतःचा आत्म गौरव, आत्म सन्मान जपण्याची शक्ती वेदांद्वारे मिळते.
दिव्य, भव्य आणि अतुलनीय असणारी आपली भारतीय संस्कृती आता तडा जाऊ पाहात आहे.
ज्या संस्कृती पासून मानवी जीवनाच्या प्रत्येक समस्येची सामाजिक, आर्थिक, नैतिक, अध्यात्मिक उकल करण्याचे सामर्थ्य आहे, आणि तिचेच आम्ही पाईक आहोत असेच प्रत्येकाने उरी बाळगले पाहिजे. त्या संस्कृतीचा अभिमान असायलाच पाहिजे.
धर्म, पंथ, सांप्रदाय या दंद्वातुन संस्कृतीची सुटका झाली पाहिजे. या उन्नत व गौरवसंपन्न संस्कृतीचे दर्शन विश्वाला घडविण्याचे प्रयत्न व्हायलाच पाहिजे. हा विश्वकल्याण चा व्यापक हेतू संत ज्ञानदेवांनी पसायदानातून सर्वांपुढे मांडला आहे. सर्व सत पुरुष्यांनी मानवी कल्याणाची उत्कटता व उदात्तता फार जोपासली आहे.
श्रद्धा,धर्म, संस्कृती मूर्तीपूजा यांचे चुकीचे सन्दर्भ लावून चित्तशुद्धीच्या नावावर आजच्या काळातील काही संत मानवी कल्याणाचा मार्ग कलुषित करीत असतात. त्याचा विरोध झाला पाहिजे. भक्ती-मार्गा वरून चालणारा भाविक आज अंधश्रद्येच्या दलदलीत खितपत आहे. निवळ मंदिरांची व देवांची संख्या वाढवून श्रद्धा वाढत नाही. ‘चांगल्या वाईटाची पारख करणारी दृष्टी प्राप्त व्हावी, हीच डोळस श्रद्येची खरी व्याख्या आहे. आज विविध आश्रमांतून कर्तृत्वाचा व निष्क्रियतेचा जो जप सार्वत्रिक निदर्शनास येतो, ती भोगाचीच दुसरी बाजू होय, भक्तीची व योगाची कोणतीच लक्षणे नाहीत. श्रद्द्येचा गैरफायदा घेत अनैतिक कृत्यांना खतपाणी घालण्याचे कांही काही आश्रमांत चाललेले असते. हि कृती सामान्य जनतेला विनाशाच्या खाईत लोटत आहेत.
यावरून असे वाटते श्रद्द्येची स्पटिक दृष्टी निर्माण करण्यावरच भर दिला जावा. यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. आत्म श्रद्धा जागृत करून कार्यनिष्ठा व जीवननिष्ठा जोपासली गेली पाहिजेत. प्रयत्नवादाला भारतीय संस्कृतीने फार महत्व दिलेले आहे.
प्रयत्नवादच जीवनातील पलायनवाद,निष्क्रियता याचे पलायन करू शकतो. मानवी कल्याणाचे तत्वज्ञानं निश्चितच क्लिष्ट नाही. सहज, सुलभ,परोपकारी वृत्तीने प्रामाणिक प्रयत्नांनी जगत राहिले कि जीवन उन्नतीचा मार्ग सहज समृद्ध होतो. प्रयत्नवादाला डोळस श्रद्द्येची जोड दिली कि वैचारिक क्रान्ति आणि मानसिक परिवर्तनही शक्य होते. म्हणून वैचारिक दुष्काळ असलेल्या या युगात संस्कृतीच्या यज्ञज्वालेवरं आत्मोन्नतीची मशाल प्रकाशित करूया.