देह देवाचे मंदिर




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2151

Deh Devache Mandir :

Deh Devache Mandir beautiful Marathi bhajan of Sant Tukaram. Sant Tukaram says in simple words that our body is the temple of God.Inside is God in the form of the soul like there is sugar in sugarcane, just like that God resides in our heart/soul. Read Full Story on Deh Dewache Mandir.

Deh Devache Mandir

मानवाचे मन शुद्ध,पवित्र,निर्मळ झाले  तर त्याला तीर्थाटन, जप, जापमन्त्र, स्तोत्र पठण करायाची गरज नाही मुख्य म्हणजे आपले मन आकारात बसले पाहजे. बाहेरची तालीम काही महत्वाची नाही. मन अंतर्मुख करण्याकरिता प्रारंभावस्थेत हि साधने ठीक आहे.

आत्मरूपाच्या ठिकाणी ध्यान केल्याने दहाही दिशेला भटकणारे मन स्वरूपाच्या ठिकाणी लै पावते हि युक्ती मुमुक्षु संतांकडून जाणून घ्यावी. मन स्थिर झाले कि शांती लाभते. शुद्ध विचार हा पवित्र मनातच उदभवतो.पावित्र्याचे शिवाय जीवनात सुख-शांती सामाधान लाभत नाही. शांती हि प्रत्येकाला हवीहवीशी असते त्यासाठी प्रत्येकाचे खटाटोप चाललेले असतात. परंतु त्यासाठी होणारे खटाटोप कुणाचे चुकीचे असतात त्यामुळे त्यामुळे त्यांच्या जीवनात अशांती निर्माण होते.

** श्रद्धा म्हणजे जीवनबोध. श्रद्धेची उपासना म्हणजे देवीची उपासना होय. श्रद्धा हा मानव जीवनाचा उगमच आहे. ती प्रत्येक जिवाच्या ठिकाणी असते आणि तीच त्याला पुढे पुढे नेत असते. त्याच सोबत आत्मबल लाभलेली व्यक्ती सुखाची वाटेकरी होते.

** ज्ञानाचा प्रकाश आपल्या जीवनात आला कि , सारेच अमंगळ दूर होत जाते. सुख –दु:खाचा अनुभव घेत असताना जे संस्कार मनावर उमटतात तेच शील होय. सु:खा पेक्षा दु:खच माणसाला अधिक काही शिकवून जाते. त्याचे आत्मभान जागृत होऊन आपले जीवन ते चांगल्या रीतीने जगू शकतो म्हणूनच म्हणतात जीवनात दु:ख हे आवश्यकच आहे.  दु:ख हे आपल्या जीवनाच्या वेगाचे झटके आहेत, ते आल्याशिवाय मनुष्य सावध होत नाही. सु:खात मनुष्य जीवनाच्या वेगाने कधी कधी चुकीचा प्रवास करून रस्ताच चुकतो.

** आपण जगाचे ऋणी आहोत. जगासाठी काही करायाची संधी आपल्याला मिळाली आहे. अशी भावना  ठेवून काही सद्यकार्य केले पाहिजे. म्हणून तुकोबा म्हणतात —

 देह देवाचे मंदिर | ओम आत्मा परमेश्वर ||

जशी उसामध्ये साखर | तसा देहामध्ये ईश्वर||

जसे दह्यात लोणी | तसे देहात चक्रपाणी ||

तुका सांगे मूढ जना | देही देव का पहाना ||

देह देवाचे मंदिर | आटण आत्मा परमेश्वर  ||

देह हे परमेश्वराचे निवास स्थान आहे. देहात आत्मरूपाने परमेशवराचा वास आहे. देव आपल्या मुखाने बोलतो. डोळ्याने पाहतो, सर्व देहाच्या क्रियांचा तोच करविता आहे. तो आपल्याकडून करवून घेतो. कर्मबंधना पासून आपण स्वतःला मुक्त ठेवावे. आत्म साक्षात्काराकरिता आत्म्या वरील सर्व संस्कार नष्ट होणे अत्यंत आवश्यक आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2151




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu