भव सत्यसचिन हे निमित्त मात्र….




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Bhaw Satyasachin He Nimitta Matra…

This article is about the Bhagavad-Gita. The Gita is set in a story of a discourse framework between Pandava, Arjuna and his guide and charioteer Lord Krishna. You will learn few part of Bhagvat Geeta from This blog. Check full blog for Points given in Bhagavad-Gita.

Bhaw Satyasachin He Nimitta Matra...

 

भगवत गीतेतील विश्वरुप दर्शन योगात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतात  कारण अर्जुनाने युद्धाला प्रतिपक्षात सर्व आप्तांना पाहून युद्ध न करण्याचा निर्णय करतो त्यावेळी श्रीकृष्ण सांगतात – कि मी सर्व सृष्टीचा काळ असून सर्व पापियांचा संहार करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. इथे तू निमित्तमात्र आहेस. कारण या कौरव पक्षातील सैन्याला मी केव्हाच मारले आहे. यांच्यामुळे अधर्म वाढत गेला आणि शेवटी युद्धाची परिस्थिती निर्माण झाली.

जेव्हा धर्माचा ऱ्हास होऊन अधर्म वाढून विकोपाला पोचतो तेव्हा तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी मला अवतार घ्यावाच लागतो. सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी तसेच धर्म स्थापनेसाठी निर्गुण निराकार परब्रम्हाला सगुण साकार सृष्टीच्या रक्षणासाठी पृथ्वीवर यावे लागते. धर्माचे व नीतीचे पालन व्हावे सृष्टी रक्षिली जावी हाच हेतू असतो.

 असे असूनही अर्जूला वाटते — शत्रू पक्षात सर्व माझे गुरुजन व वडीलधारी योद्धये आहेत यासर्वांची हत्या करून मला पृथीचे राज्य व विजय नकोच आहे हे सर्व सुख भोगून मला पापांचा भागीदार व्हायचे नाही.

तेव्हा श्रीकृष्ण समजावतात अरे ज्यांना तू आप्त मानतोस ते इथे शरीर रूपाने आहेत. आणि त्यांचा विवेक नष्ट झाला आहे. अश्या विवेकहीन योद्धांना मी केव्हाच मारूंन टाकले आहे आणि तू जो विचार करतोस तो फक्त व्यक्ती म्हणून परंतु हे युद्ध व्यक्तियुक्त नाही हे धर्म युद्ध आहे आणि धर्म हा आपला श्वास आहे. तू क्षत्रिय  आहेस तेव्हा युद्ध करणे हा तुझा धर्म होय.

कौरवांनी पांडवांवर सतत अत्याचार केला आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu