अध्यात्म
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Adhyatma-

This article contain information on Adhyatma and social affairs. must read this for getting information about Adhyatma. Spirituality is a broad concept with room for many perspectives. In general, it includes a sense of connection to something bigger than ourselves, and it typically involves a search for meaning in life. Read this article based on the Spirituality.

Adhyatma

बुद्धी योगी पुरुष्याला गीतेत ” स्थितप्रज्ञा ” असे म्हणतात. जेव्हा मनुष्य मनातील अनिष्ट विषय भावना सोडून आत्मानंदात मग्न असतो. तेव्हा त्याला स्थितप्र म्हणतात.  दुःखा मुळे ज्यांचे मन उद्विग्न होत नाही.  सुखा विषयी ज्याच्या मनात आसक्ती नसते. ज्यांचे लोभ, भीती, क्रोध हे विकार नष्ट झालेले आहेत. जो सर्व गोष्टीत अनासक्त असतो व शुभशुभाच्या प्राप्तीमुळे ज्याला हर्ष वा विषाद वाटत नाही. त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समजावे.कासव जसे आवश्यकतेनुसार आपले अवयव आंत ओढून घेतो तसेच जो अनिष्ट विषयांपासून आपली इंद्रिये आवकरून घेतो त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे असे समजावे. मनुष्ययुआची इंद्रिये इतकी दांडगी असतात, की इंद्रियांच्या निग्रहा साठी प्रयत्न करणाऱ्या विद्वान पुरुष्याचं मन ती भलतीकडे वळून नेतात. म्हणून त्या सर्वांना आवरून व योगयुक्त होउन मनुष्याने ईशवरनिष्ठ  झाले पाहिजे. ज्याची इंद्रिये त्याच्या स्वाधीन असतात त्याचीच बुद्धी स्थिर असते. विषयांचे चिंतन करू नये ते केल्यास त्याबद्दल मनात आसक्ती निर्माण होते. आसक्तीने इच्छा निर्माण होतात. आणि इच्छेची तुप्ती झाली नाही की राग उत्पन्न होते. त्या रागापासून अविचार जन्माला येतो. अविचाराने बुद्धी भ्रष्ट होते आणि बुद्धी नाशाने मनुष्याचा सर्वनाश होतो. म्हणून या उलट लोभ व द्वेषाची भावना सोडून इंद्रिये स्वतःच्या ताब्यात घेणाऱ्या मनुष्याला मनाची प्रसन्नता वाटते आणि मन प्रसन्न असले की सर्व दुःखांचा नाश होतो. बुद्धी तत्काळ स्थिर होते. या उलट ज्याची बुद्धी स्थिर नसते त्याचे विचार निर्दोष नसतात. त्याच्या भावनाही अयोग्य असतात त्याचे मन स्थिर नसल्याने त्याला सुख कसे लाभणार !

जो सर्व प्रकारच्या अनिष्ट विषयेच्छा, लोभ. ममत्व व अहंकार  सोडून वागतो त्यालाच मनाची शांती प्राप्त होते. तिला ” ब्राम्हीस्थिती ” म्हणतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu