भगवतगीता वास्तविक काय आहे ?
Like
Like Love Haha Wow Sad Angry

What is Bhagavat geeta in real ?

The Bhagavat-Gita is a standout amongst the most antiquated religious sacred writings of the world. It contains the direct message of the God. It is a discourse among God and his closest devotee. The talk was conveyed initially in Sanskrit, however today its interpretations are accessible just about in each dialect. Read full article on The Bhagvat Geeta in Reality.

What is Bhagavat geeta in real

भौतिक जीवन कसें असते या विषयी जे अज्ञान आहेंत त्या अज्ञानातून मानवजातीला मुक्त करणे हेचं भगवद्गीतेचे प्रयोजन आहें. प्रत्येक मनुष्याला नाना प्रकारच्या अडचणी असतात, अर्जुनच नव्हे तर आपणापैकी प्रत्येकजन या भौतिक जीवनामुळे अनेक चिंतांनी व्याप्त आहे. आमची तर येथील सत्ताच असतरुपी वातावरणातील आहें. वस्तूत: आपण या असतरुपी वातावरणाने घाबरून जावें असें नाही कारण आपले अस्तित्व शाश्वत आहे. परंतु कोणत्याही रूपाने का होईना, आपणाला या असत वातावरणात  ठेवण्यांत आलेलें आहे, जे वस्तुत: नाहीं त्यालाच ”असत” म्हणतात.

जसे दु:ख भोगीत असणाऱ्या अनेक मनुष्यांपैकी फक्त थोडेच जण असें आहेत कि ज्यांना वस्तुत: आपल्या जीवनाविषयी आपण कोण आहोतं, आपणाला अश्या विचित्र अवस्थेत का ठेवण्यात आले आहे या संबंधी जाणून घेण्याची जिज्ञासा आहे. आपण दु:ख कां भोगत आहोत ह्या संबंधी जाणून घेण्याची जिज्ञासा जर जागृत झाली नाही, हि दु:खे आपणाला नकोत आपणाला या सर्व दु:खांतून सुटका करून घेण्याची ईच्छा आहें हे जर खरोखरीच मनुष्याला कळलें नाही, तर अश्या मनुष्याला यथार्थ मानव समजता येणार नाही, मनुष्याच्या मनातं हि जागृती होणें म्हणजेच मानवतेची सुरवात आहें, या जिज्ञासेला ”ब्रम्ह जिज्ञासेला ” असें म्हणतात.

या भगवद गीतेच्या विषयांत पाच मुलभूत तत्वांच्या ज्ञांनाचा सामावेश होतो.

सर्वात प्रथम ईश्वरीय विज्ञान आणि नंतर जीवांच्या स्वरूप स्थितीचे प्रतिपादन आहे. ईश्वर हा सर्वांचा नियंता आहे आणि जीव हे नियंत्रित आहेत. जर एखादा जीव म्हणेल कि माझ्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मी पूर्ण स्वतंत्र आहे असा हा प्राणी बुद्धीभ्रष्ट समजावा. जीव हा प्रत्येक बाबतीत त्याच्या बद्ध जीवनात नियंत्रित  झालेला असतों. प्रकृती आणि काल ( म्हणजेच अखिल विश्वाच्या अस्तित्वाचा किंवा प्रकृतीच्या अविष्कर्नाचा किंवा सृष्टीचा कालावधी ) कर्म यांचीही चर्चा गीतेंत आहे. विश्वाचे प्रगटीकरण विविध कर्माने परिपूर्ण होते. सर्व जीव निरनिराळे कर्म करतात. ईश्वराचे स्वरूप काय?  जिवाचे स्वरूप काय ? प्रकृतीचे स्वरूप काय? विश्वाचे प्रकट स्वरूप काय? या विश्वावर काळाचे नियंत्रण कसे आहे ?  आणि जीवांच्या कर्माचे स्वरूप काय? या सर्व बाबींचे ज्ञान आपण भगवद गीतेतून घेतलेच पाहिजे. ईश्वर, प्रकृती, जीव, काल आणि कर्म या पांच प्रतिपाद्य तत्वांतून भगवदगीतेने असे सिद्ध केले आहें कि भगवान श्रीकृष्ण अथवा परब्रम्ह अथवा परमेश्वर अथवा परमात्मा या तत्वात श्रेष्ठ आहें. चैतन्यगुणात जीव आणि ईश्वर समान आहेंत.

उदा: भगवंत विश्वातील सर्व कर्मे आणि प्रकृती इत्यादींचा नियंता आहे. मात्र प्रकृती स्वतंत्र नाही, प्रकृती भगवंताच्या नियंत्रणाखाली क्रिया करते.

विश्वात ज्या आश्चर्यकारक गोष्टी घडत आहेत तेव्हा आपणाला असे समजले पाहिजे कि सृष्टीतील या आविष्काराच्या मागे, तो सृष्टीचा नियंता आहे, जी नियंत्रित नसते अशी कोणतीही वस्तू प्रगट होऊ शकत नाही. म्हणून नियंताचे अस्तित्व न मानणे हे बालिशपणाचे लक्षण आहे.

आज मनुष्याने जे यंत्र, तंत्राचे शोध घेतले  आहेत. आणि याचा चालक म्हणजे मनुष्य आहे त्याच प्रमाणे सृष्टीचा चालक ईश्वर आहे. आणि यंत्र चालविणारा चालक आहे त्यांत  ईश्वराचा अंश आहे. म्हणूनच तो हे महान कार्य करू शकतो कारण तो ईश्वराचा अंश आहे.  ज्या प्रमाणे सुवर्णाचा एखादा कण म्हणजे सुवर्णच असतो. जसे महासागरातील पाण्याचा थेंब सुद्धा खारट असतो. त्याच प्रमाणे आपण जीव सुद्धा सर्व श्रेष्ठ नियंता जो परमेश्वर भगवान श्रीकृष्ण यांचे अंश असल्यामुळे. आपणात सूक्ष्म  प्रमाणात त्या भगवंताचे  गुण आहेंत म्हणूनच आपण छोटे ईश्वरच आहोत. आजही आपण अंतरिक्षावर, ग्रहांवर अधिपत्य किंवा नियंत्रण स्थापित करीत आहोत. हि प्रवृत्ती  मुळची भगवंताचीच आहे. आपण भगवंत नाही परंतु त्याचे अंश आपणात आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu