What is Bhagwat Geeta?
Bhagavad Gita often referred to as simply the Gita. The Bhagavad Gita presents a synthesis of the concept of Dharma.The Bhagavat-Gita is considered by eastern and western scholars alike to be among the greatest spiritual books the world has ever known. The Bhagavad Gita often referred as simply the Gita that is part of the Hindu epic Mahabharata. Read complete article in Marathi.
भौतिक प्रकृति हि काय आहे ? प्रकृति एक ‘परा’ दुसरी ‘अपरा’ परंतु ह्या दोन्हीचा नियंत्रक भगवंत आहे. सत्व, रज, तम, अशी त्रिगुणात्मिका प्रकृति आहे. या त्रिविध गुणांच्या पलीकडे शाश्वत ”काल” तत्व आहे. या त्रिगुणांच्या एकत्रीकरणामुळे आणि शाश्वत काल तत्वाच्या नियंत्रण व देखरेखीखाली सर्व कर्मे चालतात आणि आपण त्या कर्मामुळे सुख-दु:खे भोगतो. याला ”कर्म तत्वे” म्हणतात.
ईश्वर, जीव, प्रकृति, शाश्वत काल आणि कर्म या पाच तत्वांपैकी ईश्वर, जीव, प्रकृति आणि काल हि तत्वे नित्य आहे. प्रकृतीची अभिव्यक्ती ठराविक अंतराने होत असते नंतर काही काळ ती टिकून राहते व नंतर अदृश्य होते. अशी हि प्रकृतीची कार्ये सुरूच असतात. म्हणून प्रकृति नित्य आहे मिथ्थ्या नाही. भगवंत प्रकृतीला ”माझी प्रकृति ” असे म्हणतात. हि त्यांची वेगळीच शक्ती आहे. त्याच प्रमाणे जीव सुद्धा त्यांचीच शक्ती आहे. जिवाचा भगवंताशी नित्य संबंध आहे. तसेच या तत्वांचा एकमेकांशी संबंध आहे. परंतु पाचवे तत्व कर्म हे नित्य नाही. कर्माची फळे तात्काळ नसून पुरातन असू शकतात. आपण अनादी काळापासून कर्माची फळे ( सुख-दु:ख ) भोगीत असतो. परंतु आपण या कर्मफळात बदल घडून आणू शकतो. परंतु हा बदल आपल्या ज्ञानाच्या पूर्णतेवर अवलंबून आहे. आपल्या या सर्व कर्मांच्या फळांपासून मुक्त होण्याकरीता आपण कोणत्या प्रकारची कर्मे करावी हेच आपल्याला माहित नसते.
जीव आणि ईश्वर हे चेतन आहेत. जीव हा आपल्या विशिष्ट शरीराचा ज्ञांता आहे. मात्र भगवंत हा संपूर्ण शरीराचा ज्ञांता आहे. हा सर्व व्यापी आहे, हा प्रत्येक जीवांच्या हृदयांत असतो. आणि म्हणूनच भगवंताला त्या प्रत्येक जिवाच्या मानसिक हालचालिंचे ज्ञान असते. तो जिवाला त्याच्या इच्छे प्रमाणे जेव्हा जीव सद्गुणी होतो, स्थिरचित्त होतो आणि आपम कोणती कर्मे करावी हे त्याला समजते, तेव्हा त्याच्या कर्माच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. यावरुन हे सिद्ध होते कि कर्म हे शाश्वत म्हणजे नित्य नसते. बाकी चार तत्वे नित्य व कर्म हे नित्य नाही.
भगवंताची चेतना व जीवाची चेतना हि फार दिव्य आहे. मात्र प्राकृतिक परिस्थितीच्या किंवा मायेच्या आवरणामुळे चेतना विकृत स्वरूपात प्रतिबिंबित होऊ शकते. परंतु भगवंताच्या चेतनेवर प्राकृतिक परिस्थिती किंवा माया आवरण घालू शकत नाही. ते भौतिक विश्वात अवतरीत होतील तरी त्यांची चेतना मायेने आवृत्त होत नाही. भगवंतावर मायेचे आवरण असते तर भगवद गीतेत त्यांनी ज्या दिव्य गोष्टी सांगितल्या आहे त्या सांगता आल्याच नसत्या. मायेच्या आवरणातून चेतना मुक्त झाल्या वाचून कोणालाही दिव्य विश्वाविषयी काहीच सांगता येत नाही. भगवंत हे मायेच्या दोषांतून नित्य मुक्त आहेत. तेव्हा आपण सुद्धा या मायेने दुषित झालेल्या चेतनेला शुद्ध केले पाहिजे. जेव्हा आपली चेतना शुद्ध होते तेव्हा आपली कर्मे ईश्वराच्या ईच्छा पुर्तीला अनुकूल अशी होतात. आणि त्यामुळे आपण सुखी होतो.
जेव्हा आपण मायेने दुषित झालेलो असतो त्याला बुद्धजीवी म्हटले जाते. हा मिथ्थ्या अहंकार होय.