Shrimad Bhagwat Geeta –
The Bhagavat- Gita is considered by eastern and western scholars alike to be among the greatest spiritual books the world has ever known. The Bhagavad Gita often referred as simply the Gita that is part of the Hindu epic Mahabharata.Read Full Article on Marathi Unlimited.
गीता म्हणजे वैदिक विद्देचे सार (औषध) आहे. आपणाला एक विशिष्ट औषध पाहिजे असल्यास आपण औषध पात्रावर जे लेबल असेल त्यांत लिहिलेल्या आदेशानुसार क्रिया करितो. आपल्या मतानुसार किंवा एखाद्या मित्राच्या सल्ल्यानुसार औषध घेत नाही. ते डॉ. किंवा लेबलवर लिहिल्या प्रमाणे ते घेतो. त्याचप्रमाणे भगवतगीतेच्या प्रवक्त्याने स्वत: हि भगवत गीता जशी सांगितली आहे त्याचप्रमाणे किंवा त्या आदेशाप्रमाणे स्वीकारली पाहिजे. भगवान हा शब्दाचा अर्थ एखाद्या शक्तिशाली महापुरुष किंवा एखादी देवता असा केला जातो. आणि गीतेत निश्चितच भगवान या शब्दावरून श्री कृष्ण हे एक महापुरुष आहे हे स्पष्ट होते. श्री कृष्ण हे एक आदिपुरुष आहेत. महान आचार्यांनी आणि वैदिक विद्देतील भारतातील अनेक अधिकारी व्यक्तिंनी या सत्याला मान्यता दिली आहे.
भगवत गीता हि प्रथम त्यांनी सूर्य देवाला, सूर्य देवाने मनुला, व मनुने इक्ष्वाकुला सांगितली आहे. या प्रमाणे परंपरेने प्राप्त झालेली हि योग पद्धती एका प्रवक्त्याकडून दुसर्या प्रवक्त्याकडे चालत आलेली आहे. परंतु कालांतराने ती लुप्तप्राय झाल्यासारखीच होती. हि विचारमालिका पुन्हा नव्याने स्थापित करण्याची भगवंतांची इच्छा होती म्हणून त्यांनी त्यांच्या साक्षात शिष्य, जिवलग सखा, भक्त अर्जुन यांस ती कुरुक्षेत्रात सांगितली.