पर्यावरणावरील प्रदूषण परिणाम आणि पशु पक्षी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Environmental Pollution and Its Effects –

Pollution is the introduction of contaminants into the natural environment that cause adverse change. One of the greatest problems that the world is facing today is that of environmental pollution, increasing with every passing year and causing grave and irreparable damage to the earth. Pollution affects animals by destroying their habitats, poisoning them, forcing them to migrate and causing disease or vulnerability. Along with harming human health, air pollution can cause a variety of environmental effects: Acid rain is precipitation containing harmful amounts of nitric and sulfuric acids. These acids are formed primarily by nitrogen oxides and sulfur oxides released into the atmosphere when fossil fuels are burned. Read More

Environmental Pollution and Its Effects

 

सभोवतालची भौगोलिक परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. यातही ऋतुमानाचा बदल हे या सजीवांच्या जीवनावर परिणाम करीत असतात. पर्यावरण पोषक असेल व त्यात निसर्गाच्या चक्राप्रमाणे बदल होत असतील तर ते मानवी जीवनाप्रमाणे पशुपक्षाच्याहि जीवनाला पोषक असतात. परंतु ते निसर्गाच्या रचणेविरुद्ध होत असतील तर ते या सजीवांच्या जिवाला व अस्तित्वाला घातक असतात.

मानवाद्वारे अलीकडे पर्यावरणावर मोठमोठे आघात होत आहे. निसर्गाच्या रचनेत फार मोठी ढवळा ढवळ होत आहे. मानवाच्या या ढवळा-ढवळी विघातक परिणाम दिसून येत आहे. प्रचंड प्रमाणातील वृक्ष तोड, नद्यांमधील मोठ्या प्रमाणातील वाळू उपसा,डोंगराचे सपाटीकरण,मोठ्याप्रमाणात कारखाने उभारणी व त्या कारखान्यातील रासायनिक द्रव्यांना नद्या किंवा नाल्याच्या पाण्यात सोडणे. कारखान्याचे धुराडे फार कमी उंचीचे करणे. हे पशु पक्षांच्या जिवाला घातक आहे. वाढत्या वृक्ष कटाईमुळे पर्यावरणातील ऑक्सिजन प्रमाण घटत आहे. व कारखान्यामुळे कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे. याच परीणामाने  पशु- पक्षांची संख्या फार झपाट्याने  कमी होत आहे. अनेक उपयुक्त असे वृक्ष नामशेष होत आहे. व वृक्षांची वाढ खुंटत आहे. त्यांच्या फळं- फुलांवरही परिणाम होत आहे.

पशु-पक्षांवरही प्रकर्षाने  बदल तसेच विहार व आचरणात फरक दिसून येत आहे.. ते या प्रमाणे –

निसर्गाच्या रचनेतील वाढता मानवी हस्तक्षेप, प्रचंड वृक्ष कटाई यामुळे पशु -पक्षी अस्वस्थ अवस्थेत दृष्टीस पडत आहे. प्रचंड प्रमाणात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे व झाडांच्या तोडीमुळे पक्षी अवकाशात जास्त वेळ विहार करू शकत नाही व उंचावर उडू शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे हवेतील प्राणवायूचे प्रमाण कमी असल्याने ते लवकर थकतात व जमिनीवर येउन बसतात. वृक्ष तोडीमुळे जंगले विरळ झालीत पशु पक्षांना विसाव्यासाठी सावली नाही. लपण्यासाठी सुरक्षित जागाच उरलेली नाही. यामुळे त्यांच्यावर प्रचंड मानसिक तणाव असतो. त्यांच्यात एक प्रकारची भीती असते.

पूर्वीच्या काळी सकाळी-सकाळी एकू येणारा पक्षांचा किलबिलाट आता पूर्वीसारखा एकू येत नाही. पक्षांचे थवेच्या थवे आकाशात दिसत नाही, थोडक्यात सांगाचे म्हणजे त्यांच्या जीवनातील चैतन्य, उत्साह, जोम जणू संपला कि काय ? असे वाटते पशु हि झपाट्याने कमी होत आहे. त्यांचाहि मुक्त विहार नाही. त्यांच्या झुंडीच्या झुंडी नाहीत. हा सर्व प्रकार वृक्ष तोडीचाच वाटतो. तद्वतच कमी कमी होत असलेला प्राण वायू.

 पूर्वी सारखे स्वच्छंदि, आनंदित व उत्साही जीवन जगणे आता पशु-पक्षांना शक्य नाही म्हणून ते अस्वस्थ, अस्थिर, व निरुत्साही अवस्थेत दिसतात. वाढते प्रदूषण, वाढते तापमान, आटलेल्या नद्या, तोडलेली वृक्षे, हे सर्व पशु-पक्षांच्या अवस्थेला वाढविणारे घटक आहे. पशु-पक्षांना नैसर्गिक जीवन आता दिवसें – दिवस अशक्य होत आहे. त्यांना पुरेसे खाद्य मिळत नाही पाण्यासाठी वन – वन भटकंती करावी लागते. प्रसंगाव्धान सुरक्षिततेसाठी जागा राहिलेली नाही. हा सर्व प्रकार त्यांची अस्वस्थ ता वाढवीनारा आहे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu