भगवत गीता सार …




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Bhagwat Geeta –

The Bhagavat-Gita is considered by eastern and western scholars alike to be among the greatest spiritual books the world has ever known. The Bhagavad Gita often referred as simply the Gita that is part of the Hindu epic Mahabharata. Read Full article on BHgvat Geeta from Marathi Unlimited.

Bhagwat Geeta

भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात कि आपल्या नवीन परंपरेतील पहिला शिष्य तुलाच करीत आहे. त्यांची अशीही इच्छा होती कि आपल्या शिकवणुकीचा प्रचार पुन्हा नव्याने अर्जुनाने करावा. भगवत गीतेच्या ज्ञानात अर्जुनाने अधिकारी व्हावे. अर्जुन हा भगवंतचा साक्षात शिष्य आणि जिवलग सखा होता. मनुष्य भगवंताचा भक्त झाला कि तत्क्षणी त्याचा भगवंताशी साक्षात संबंधहि प्रस्थापित होतो.

भक्ताचा भगवंताशी संबंध पाच निरनिराळ्या मार्गापैकी एका मार्गाने होतो. ती मार्ग म्हणजे अशी-

१.  मनुष्य कर्म संन्यास अवस्थेतील भक्त असू शकतो.

२.  मनुष्य कर्मयोग अवस्थेतील भक्त असू शकतो.

३.  मनुष्य भगवंताचा सखा या नात्याने भक्त असू शकतो.

४.  मनुष्य वात्सल्य भावाने भक्त असू शकतो.

५.  मनुष्य माधुर्य भावाने भक्त असू शकतो.

अर्जुनाचा भगवंतशी संबंध सख्य भाव या दृष्टीने होता. अर्थात हा सख्यभाव व संसारिक सख्य यात भिन्न्तेची फार मोठी दरी आहे. त्यांचा हा दिव्य असा सख्यभाव होय तो प्रत्येकाला प्राप्त होणे शक्य नाही. तसे मनुष्याला भक्तीयोग मार्गाने ते स्वरूप प्राप्त करून घेता येते. या अवस्थेला स्वरूप सिद्धी म्हणजे मनुष्याच्या मुळ अवस्थेचे परिपूर्णत्व असे म्हणतात. अर्जुनाचा हा सख्य भावाने नित्यसंबंध होता. सर्व जीव हे ब्रम्ह आहे परंतु अर्जुन भगवंतांना परब्रम्ह मानीत होते. तुम्ही परम ब्रम्ह, आदिदेव, चिन्मय, मुळ पुरुष आहात, तुम्ही अजन्मा, सर्वव्यापी सौंदर्य संपन्न आहात असे म्हणतात. ते भौतिक उपाधीतून मुक्त आहेत. श्रीकृष्ण हे स्वयं भगवंत आहेत असा स्वीकार केवळ मीच नव्हे तर नारद, असित देवल व्यास देव इत्यादी सारखे महान अधिकारी महर्षी सुद्धा मानतात. भगवंतांचे  स्वरूप समजणे फार कठीण आहे. मोठमोठ्या देवतांना सुद्धा भगवंताचे ज्ञान होणे कठीण आहे. याचा अर्थ असा कि मानवापेक्षाहि श्रेष्ठ असे जे प्राणी आहेत तेसुद्धा भगवंतांना जाणण्यास समर्थ नाहीत, मग मनुष्याला तर तो भगवद भक्त झाल्यावाचून  श्रीकृष्णाचे ज्ञान कसे प्राप्त होऊ शकेल?

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu