सुविचार




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Marathi Thoughts :

If you want Marathi suvichar, Marathi vichar dhan, Marathi akshar Manch them read this. great collection of thoughtful suvichar. Quotes of all Famous Indians.

Marathi Thoughts

सुविचार :

  •  जगातील सुंदर गोष्टी डोळ्याने किंवा स्पर्शाने अनुभवता येत नाहीत, त्या हृदयानेच अनुभवाव्या लागतात.
  • प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे नंदनवन करता येते.
  • मनुष्य सुंदर नसला तरी मनातल्या चांगल्या भावनांनी तो सुंदर दिसतो, परंतु एखादी व्यक्ती  खूप सुंदर असेल पण मनाने दुष्ट असेल तर ती कुरूपच दिसते.
  • जन्म, मृत्यू, अग्नी, वादळ  यापैकी कशानेच चांगले विचार किंवा कृत्य संपत नाही.
  • आपले काम जबाबदारीने व प्रामाणिकपणे करणे हाच सर्व सन्मानाचा मार्ग होय.
  • दुसऱ्याचे काहीही एकूण घेण्याची क्षमता म्हणजे शिक्षण. दुसर्याचे म्हणणे एकूण घेताना तुम्ही आत्मविश्वास किंवा आपल्या मनाची शांतता गमविता कामा नये. तरच ते खरे शिक्षण होय.
  • उद्याचे जे नियोजन आपण आज करतो, ते म्हणजे भविष्य नव्हे. आज जे काही करीत आहोत त्याचा परिणाम म्हणजे भविष्य असते. म्हणून आज चांगले कार्य करा आणि भविष्य उज्वल बनवा.
  • संस्कार म्हणजे माणसाच्या संवेदना अधिक तरल आणि व्यापक करणे. त्याची  विवेक शक्ती जागृत करणे.
  • कोणतेही ध्येय घेतले तरी ते साध्य होण्याकरीता उद्योग हा करावाच लागतो. ध्येय आपण होऊन निरुपयोगी माणसाच्या हाती पडत नाही.
  • प्रेम हि विलक्षण भावना आहे. मनात प्रेम असल्याशिवाय आपण दुसऱ्याचे मन समजू शकत नाही, जेव्हा मनात प्रेम असते, तेव्हाच व्यक्ती- व्यक्तींत उत्फूर्त आणि सुसंवादी संबंध निर्माण होतात. व जीवनाच्या विविधतेचा, सुक्ष्मतेचा व सखोलतेचा साक्षात्कार होतो.
  • कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींचे कुटुंबातील सर्व व्यक्तिंवर प्रेम असावे. प्रत्येक व्यक्ती आपलीच आहे असे वाटायलाच हवे. त्यातूनच कुटुंबांविषयी आत्मीयभाव वृद्धिंगत होईल. आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला हे काम माझेच आहे व ते करण्यात माझा गौरव आहे असे वाटायला हवे. तेव्हाच पारिवारिक  सामाधान व शांती लाभेल.
  • ‘जीवनात अनन्य साधारण महत्व’ – जेवणात मीठ तसेच जीवनात विनोद हा अवश्य असावा. जेवण मिठाविना शक्य नाही : पण त्याचेच काही परिणाम असते.  विनोदामुळे रोजच्या कंटाळवांण्या जीवनात लज्जत येते. ते शरीराचे व बुद्धीचे उत्तम पोषक आहेत; पण म्हणून माणूस सारखाच विनोद करू लागला, तर मात्र विनोदास पात्र होईल, म्हणून विनोदाची मर्यादा व शक्ती ओळखून विनोद केला तर आयुष्य रंगतदार व चवदार होईल.
  • तुमच्यात संपूर्ण परिवर्तन करा, मगच जग बदलेल. सामाजिक सुधारणा अथवा समाज क्रांतीचा विस्पोट व्यक्तिंमध्ये होतो या परिवर्तनाच्या आड स्मृती आणि पूर्व संस्कार येतात. म्हणून पूर्व संस्कारातून, पूर्वग्र्हातून ती मुक्त राहतील अशा तऱ्हेने आपण मुलांना शिक्षण दिले पाहिजे. विद्यार्थ्यावर अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करू नये. कोणत्याही ठरीव साच्यात ओतून त्यांना बाहेर काढू नये. त्यांना मुक्तपणे विकसित होऊ द्यावे, तरच त्यांना आपोआपच नव्या मुल्यांचा शोध लागेल.
  • तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे धडून सर्व इच्छा  पूर्ण होऊन मिळणाऱ्या  सुखाचा उपभोग घेण्याची आकांक्षा आहे. त्यासाठी तुम्ही सकारात्मक बनण्याचा प्रयत्न तुम्ही करतां आहात. मन एकदा सकारात्मक विचार करू लागले कि मन:शक्ती आपोआपच वाढते. आणि वाढलेली मन:शक्ती विचारांना बळ मिळवून देते. त्यात विचार सकारात्मक असले तर ते ब्रम्हांडांतून परावर्तीत होऊन फलद्रूप होतात. म्हणजेच तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात. इच्छा पूर्ण होत आहेत हे लक्षात आले तर  आपण योग्य मार्गाने जात आहोत असे समजावे. आता तुमच्या प्रगतीला सुरवात झालेली आहे. मनातील एक इच्छा पूर्ण झाल्यावर मात्र तिथेच थांबू नका, आपली पुढील इच्छा व्यक्त करावयाच्या तयारीत राहा. इच्छाना पूर्णविराम देऊ नका. त्यासाठी आधीच्या सर्व नियमांचे पालन करा. आणि इच्छा व्यक्त करण्याची सवय लाऊन घ्या.
  • प्रबळ इच्छा, सकारात्मक विचार, अथक प्रयत्न म्हणजेच यज्ञ अनेक वेळा मंदिरात यज्ञ होताना आपण बघतो. हे यज्ञ वैदिक किंवा धार्मिक स्वरूपाचे मंत्र पठण, स्वाहाक्कार, स्वस्तिवाचन आणि पुर्नाहुतिचे संपन्न होतात. परंतु यज्ञांचे स्वरूप ईतकेच मर्यादित आहेत काय?  कि प्रज्वलित झालेले यज्ञकुंड कि त्यात घालण्यात येणाऱ्या आहुत्या म्हणजे यज्ञ ? हा सर्व ‘यज्ञ’ या प्रकारातील एक भाग आहे.  एखादा सकारात्मक विचार धरून त्याच्या पूर्तीसाठी अंतरात्म्यापासून  एकाग्र चित्ताने तन, मन, धनाने प्रयत्न करणे म्हणजे यज्ञ, मग त्याचे स्वरूप कसेही असेल, जसे क्रांतीकारकांनी, देश भक्तांनी स्वातंत्र प्राप्तीची इच्छा धरून जे सर्वतोपरी प्रयत्न केलेत  तो स्वातंत्र यज्ञच होता, स्वातंत्र्याचे फल या यज्ञांनेच मिळाले. म्हणजे प्रबळ इच्छा, सकारात्मक विचार आणि अथक प्रयत्न म्हणजे यज्ञ होय.
Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu