True and Superior Natures law – The Natures law is based on entire truth and superiority.Gautam Buddha is the best example of this law.
जगातील सर्व श्रेष्ठ गुरुंमधील एक गौतम बुद्ध गुरु यांनी आपल्याला स्वावलंबी, स्वाश्र्यी, आत्मनिर्भर होण्याची शिकवण दिली.अदृश्य अशा संकल्पनेच्या बंधनातून मानवाला मुक्त केले. कर्म कान्डाने अनुसंधान होत नाही.बोधी निर्मळ झाल्याने अंत:कर्णाची शुद्धी होते. सत्व शुद्ध होते. संपूर्ण सृष्टी हि मानवाच्या विचारांचा परिपाक आहे. हे मन मानवाला मायेत गुंतवून टाकते. परंतु कर्माचा हेतूच मुळी कर्मशुद्धी आहे.मनाचा आत्म्यात लय होणे म्हणजेच आत्मानुभूती. म्हणून मन मोहग्रस्त विकारी होऊ न द्यावे. प्राप्त ज्ञान केवळ स्वत: पुरते सीमित न ठेवता बहुजनांपर्यंत पोहचविण्याचे कार्य त्यांनी केले. सर्वांना मुक्तपणे ज्ञान देणारी हि विभूती होय.
दुखांचा उगम हा मानवातच असल्याचे त्यांनी शोधले. कोणतीही गोष्ट घडण्यासाठी एखादे कारण लागते, हाच कार्यकारण भाव आणि हा विज्ञानाचा पायाभूत सिद्धांत आहे. आणि म्हणूनच बुद्ध हे विज्ञानाच्या संकल्पनेचे आद्य जनक ठरतात. कर्मफल सिद्धांत समजून घेतल्यावाचून माणूस सुसंस्कृत, उन्नत होणार नाही. याच कार्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले.
माणसाने जीवनाचा शाश्वत शोध घ्यावा. परिस्थिती माणसाला घडवीत नाही तर त्याचे विचारच त्याला घडवितात. मनुष्य दुसरे तिसरे काहीच नसून त्याचे विचार व त्याच्या हातून घडणारी कर्मेच कोणत्याही विचाराचे बीज त्याच्या मनात सर्व प्रथम पेरले जाते. ते तेथेच रुजते. नंतर त्यालाच अंकुर फुटतात. त्याला रुजण्यासाठी आपणच मोकळीक देतो.
चांगल्या विचारांची फळे गोमटी.व वाईट विचारांची फळे नेहमी वाईटच.
राग, द्वेष, हेवेदावे, मत्सर, असूया, दुर्भावना अमंगल हिडीस चिंतन मनाने जे लोक करतात ते नेहमी व्याकुळ,बेचैन,असंतुष्ट असतात. ते स्वत: धड जगत नाही आणि दुसऱ्यालासुद्धा जगू देत नाहीत. त्यांच्या हातून कोणतेही काम नीट होवू शकत नाही. आणि त्यांच्या बाबत सांगायचे म्हणजे त्यांच्या मनाची प्रतिक्रिया शरीरावर होऊन ते नेहमीच रोगग्रस्त असतात. मनाचे दृश्य म्हणजे डोळ्यांनी दिसणारे स्वरूप म्हणजे शरीर होय. मन मलीन दुर्भावना ग्रस्त, वासना विकारांनी व्यापलं कि त्याची प्रतिक्रिया शरीरावर प्रगट होते. वात,पित्त,कफ यातील संतुलन नष्ट होते. परिणामी शरीर रोगग्रस्त होते.
तात्पर्य — मुख्य सूत्र असे कि, रोगाचे मुळ कारण शरीरात नसून मनात असते. जवळजवळ मनुष्याला नव्वद टक्के रोग मनातूनच होतात.
मनात सतत चांगले विचार ठेवा. सन्मार्गानेच चला. क्रोधाला आवर घालून शत्रुता विसरून जाणे म्हणजेच बुद्धाचा मार्ग स्वीकारणे होय. स्वत: चे मार्गदर्शक स्वत: व्हा. प्रत्येक मनुष्याजवळ त्याची एक आंतरिक शक्ती असतेच. मनुष्य स्वत:चे सत्व स्वत: घेऊन जन्माला येतो.
बुद्ध म्हणतात मोक्षदाता तुम्हीच आहात, आणि मार्गदाता तुम्हीच आहात. तुमची वाटचाल तुम्हीच करावयाची आहे. प्रत्येक मनुष्य स्वत: चा मालिक आहे. प्रयेक क्षण होश मध्ये रहा. आपल्या आयुष्याची गती स्वत: ला ठरवायची आहे. जो क्षण मागे गेला त्यावर आपला अधिकार नाही. त्या कडे बघू नका, वर्तमानातील प्रत्येक क्षण हे बीज आहे. त्या करीता सावधान व सजग रहा. समता भाव ठेवा, मनाचे संतुलन बिघडवू नका.