Lajjatadar Tava Rice -This is the one of the favorite dish in Maharashtra made from rice. We can use leftover rice also. It takes 10 minutes to prepare. It’s mildly spiced tava rice.
साहित्य :-
- आदल्या दिवशीचा भात,लोणचे मसाला, पाव भाजी मसाला, व गरम मसाला
उकडून भाज्या :-
- मटर , बटाटा, सिमला मिरची, फ्लावर,कांदा, टोमॉटो, बटर, बेबी कॉर्न
कृती :-
- शिळा भात मोकळा करून घ्या.
- तेल गरम करून जिरे टाकून त्यात हळद व चवीनुसार मीठ घालून त्यात भात परतून घ्या.
- प्रथम तवा आचेवर गरम झाला कि बटर घाला, नंतर त्यात सर्व भाताचे प्रमाण बघून सर्व मसाले घाला व परता.
- त्यात बेबी कॉर्न,फ्लावर,बटाटा मटार सिमला मिरची व कांदा घालून चांगले परतून घ्यावे.
- नंतर टोमॉटो घालून पुन्हा परतावे मसाल्या पुरतेच किंचित मीठ घ्यावे.
- सर्वात शेवटी त्यात परतलेला मोकळा भात घालून परतून आच बंद करावी.
- त्यावर साजूक तूप व कोथिंबिर घालावी. हा भात सर्व्ह करावा. भात हा सर्व मंडळी आवडीने खातात.