Pad (Utha Utha)-
This is a marathi aarti sung in the glory of Sainath by their devotees. this Aarti is for the devotees of Sai nath. on Marathi unlimited you will get latest collection of Artis.
उठा साधुसंत साधा आपुलालें हित | जाईल हा नरदेह मग कैचा भगवंत || १||
ऊठोनिया पहाटे बाबा उभा असे विटे चरण | त्यांचे गोमटे अमृत दृष्टी अवलोकां ||२||
उठा उठा वेगेशी चला जाऊया राउळासी | जळतील पातकांच्या राशी काकड आरती देखिलिया ||३||
जागे करा रुक्मिणीवर देव आहे नीजसुखांत | वेगे लिंबलोण करा दृष्ट होईल तयांसी ||४||
वाजंत्री वाजती ढोल दमाने गर्जती | होते काकड आरती माझ्या सद्गुरू रायांची || ५||
सिंहनाद शंखभेरी आनंद होतो महाद्वारी | केशवराज विटेवरी नामा चरण वंदितो ||६||