Nari Stri Mahila –
We know that how important the women is. One of the famous saying is “Behind every successful man there is a women”. Women prefer to share and care more, she would discuss and figure out a solution for a problem which they face by discussing it with others. Read full Marathi article only on Marathi Unlimited.
पुरुषाला स्त्री सोबत संपर्क प्रथम जननी – आई, जीवन संगिनी- पत्नी, अपत्य – मुलगी या नात्याने येत असतो. परंतु ती सर्व प्रकारे त्याचे हितच करीत असते. तरी शास्त्रकारात भार्या म्हणून पुरुष्याची हित साधक म्हणून तिला सहा प्रकारात संबोधले आहे….. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता, रमनेषु रम्भा,धर्मानु कुला, क्षमया धरित्री, भार्याच षड्गण्वतीच दुर्लभा ||
म्हणजे .. कार्यात मंत्री प्रमाणे मार्गदर्शन करणारी, सेवेत दासी प्रमाणे जपणारी, भोजन समयी माता प्रमाणे पथ्य देणारी, भोग विलासात रम्भा प्रमाणे सुख पोचवणारी, धर्माचे पालन करून पृथ्वी प्रमाणे क्षमाशील असणारी. हेच खरे रूप ‘स्त्री’चे आहे. म्हणून तिला विश्वातील दुर्लभ असे बहुमोल रत्न मानलेले आहे.
रामाच्या जीवनातून सीतेला वगळले असतां रामायण रचना झालीच नसती. द्रोपदी,कुंती,गांधारी यांचे चरित्र वगळता महाभारत रचले गेले नसते, पांडवांचे जीवन संग्राम अपूर्णच असते. शिवा सोबत पार्वतीला जोडले नसते या विश्वाची व्याख्या करताच आली नसती. कृष्ण राधा,विष्णू-लक्ष्मी यांच्या लीला, गाथा, चरित्र अपूर्णच असते, त्याच प्रमाणे स्त्रीला सुद्धा वगळता येत नाही. पुरुष्याचे जीवन अपुरेच नष्ट होईल.
प्राचीन काळापासूनच स्त्री हि फक्त घर गृह्स्थीच बघत आलेली नाही तर समाज, राजनीती, धर्म, कानून, न्याय त्यासोबतच संसार आणि अपत्य संगोपन करीत पुरुषासोबत त्याची सहाय्यक, प्रेरक बनलेली आहे. म्हणूनच तिला पूजनीय स्थान देण्यात आलेले आहे. प्राचीन काळात राजा मनु ने आपल्या प्रजेला संबोधित केलेले होते जेथे नारीचे पूजन होते. तेथेच देवी देवता निवास करतात.
||” यत्र नर्यस्तू पूजंण्ते रमण्ते तत्र देवतां : || तेव्हाच समृद्धी , यश, वैभव, सुख- शांती आणि आनंदपूर्वक जीवन प्राप्त होत असते. स्त्रीचा सहयोग मानव जीवन उन्नती साठी आवश्यक आणि अनिवार्य आहे. जेथे मानव जीवनात अर्धांगिनी नाही तो सर्व अधिकारात वंचित राहून संपत्तीशाली असूनही मनाने दलित असतो.
हे आवश्यक आहे स्त्री ला समाजात तोच स्थान देण्यात यावा जेथे आमच्या ऋषी-मुनी , संतांनी सांगितलेले आहे. तिला तिच्या जीवनात सर्व क्षेत्रात समोर जाता येईल. ती अबला, असहाय्य, न राहता शक्तिशाली- सामर्थ्याची मूर्ती बनावी. तिच्या जीवन यात्रेत ती कुणावर बोझं न होता सहाय्यक आणि सहयोगिनी म्हटल्या जाईल.
भविष्यात कधी संकट काळी चिंतीत न होता स्वत: रक्षणा साठी समर्थ्य असेल. आपल्या कुटुंबाचा निर्वाह ती अटळ पणे सांभाळून घेऊ शकेल. आपल्या सामाजिक जीवनात हि महत्वपूर्ण मागणी आहे कि घरातील स्त्री हि चार दिवारीत बंद असावी. परावलंबित आणि अशिक्षित असावी, या अंधविश्वासात शेवटी तिला, अपमानित व्हावे लागते व शेवटी तिची दुर्दशा होऊन परपुरुषाची शिकार बनून तिला स्वत:चा घात करून घ्यावा लागतो. त्या करीता तिला शिक्षित, स्वावलंबि, सुसंस्कृत व विकसित होऊ देणे आवश्यक आहे.