Mughlai Chicken Korma-This is a non-vegetarian recipe which is very easy to cook. Its one of the rich recipe with lots of dry fruits and some spices. Here is the list of ingredients used in Chicken Korma.
साहित्य :-
अर्धा किलो चिकन { शक्यतो बोनलेस } दोन मोठे कांदे, अर्धा इंच आलं, दहा लसून पाकळ्या, चार हिरव्या मिरच्या, दोन टोमॉटो,एक चमचा धने पावडर, एक चमचा मिरे पावडर,एक चमचा जिरे पावडर, एक चमचा गरम मसाला, हळद, तिखट, मीठ, आवश्यकतेनुसार, पाच काजू, पाच बादाम,सात पिस्ता, पाव वाटी तूप, बारीक चिरलेली कोथिंबीर,दोन उकडून चिल्का काढलेली अंडी, अर्धा वाटी दुध, तेल आवश्यकते नुसार.
कृती:-
आल-लसून पेष्ट करावी, तूप तापवून त्यात काजू व बादाम मोठे तुकडे करून तळून ठेवावे.त्याच छोड्या गरम तुपात कांदा पातळ चिरलेला परतून घ्यावा, व त्यातच आलेलसून पेष्ट सुद्धा परतावी,खमंग होईस्तोवर परतावे. त्यात नंतर चिकन घालावे, परतत राहावे परतत असताना त्यात (केशर व दुध खलून घ्यावे ). हे दुध थोडे थोडे शिंपडत जावे. चिकनचा रंग बदलत आला कि बारीक चिरलेला टोमॉटो,मिरे पूड, धणेपूड, हळद, चवी नुसार किंचित तिखट, मीठ घालून परतावे. शिजण्या करीता थोडे गरम पाणी घालावे व मऊ शिजू द्यावे. शिजल्या नंतर बेताचाच रस्सा असला कि कोथिंबीर, वेलची पूड, गरम मसाला, काजू बदाम तुकडे घालावे. नंतर पातेल्यात काढून त्यावर उकडलेल्या अंड्यांचे काप करून सुशोभित करून ठेवावे.व नंतर खाण्यास द्यावे.