Golden Bolls – This recipe is very easy to prepare and made with the rice, paneer, potato, green chilli etc. ingredients as listed below. It’s a budget-friendly recipe. Taste it with tomato sos.
साहित्य :-
- दिड वाटी शिळा भात
- एक वाटी ब्रेडचा चुरा
- अर्धा वाटी किसलेले पनीर
- एक उकडलेला बटाटा
- पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
- दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- जिरे पूड अर्धा चमचा
- थोडे तेल अर्ध्या लिंबाचा रस
- मीठ
- साखर थोडा चाट मसाला
- थोडे आरारोट.
कृती:- भात, ब्रेडचा चुरा, बटाटा बारीक एकत्रित करून घ्या. त्यात चवी नुसार मीठ घालून, थोड्या तेलाचा हात घेऊन घट्ट गोळा तयार करा. पनीर मध्ये बारीक मिरची, कोथिंबीर, जिरेपूड, लिंबाचा रस, चाट मसाला, चवी नुसार मीठ, साखर घाला व त्याचे सारण तयार करा. नंतर मळून गोळा तयार केलेल्या पिठाची वाटी तयार करून त्यात ते सारण भरून त्याचा गोल छोटा बॉल तयार करून पूर्ण पणे बंद करा. व आरारोट पावडर मध्ये घोळून घ्या. या प्रमाणे सर्व बॉल तयार करून पंधरा मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा व नंतर गरम तेलात सर्व बॉल गुलाबीसर तळून घ्या. सॉस सोबत खाण्यास द्या.