” स्त्री ” ला हीन मानणे म्हणजेच समाज हीन बनविणेच होय !
Like
Like Love Haha Wow Sad Angry
11

Stri La Hin Manane Mhanjech Samaj Hin Banvinech Hoy – This is a Marathi article describing the reality about women situation in our society. Treating women inferior is making your society weak. Read full article on Marathi Unlimited.
Stri La Hin Manane Mhanjech Samaj Hin Banvinech Hoy

भारतीय स्त्रीची स्थिती सद्ध्या डावाडोल आहे. एकी कडे देशाच्या नव-निर्वाण कार्यात तिला भाग घेण्याचे आव्हान केल्या जाते. राष्ट्राची रक्षा आणि उद्धार करण्याचे कार्यात अग्रेसर होण्याची प्रेरणा दिली जाते. सुसंस्कृत समाज निर्माण करण्याच्या भावी पिढीला, मुलांना सुसंस्कारित, आदर्श बनविणे हे तुमचे कर्तव्य आहे याची जाणीव करून दिल्या जाते. परंतु तिची स्थिती, शक्ती , अधिकार,योग्यता, साधन कसे आणि किती आहे?  या गोष्टीवर कुणाचेही लक्ष नाही. घराच्या आतं तीच स्थिती आणि बाहेरही तीच स्थिती आहे.

आम्ही तिला नोकरी करण्या करीता समजावितो. पण संपत्तीत तिचा सारखा हक्क,किंवा अधिकार नाही हेच बजावतो. तिच्या पासून सर्व म्हणजे समाजोद्धार ,राष्ट्राची उन्नती या सर्व कामात तिची सहायता करण्याची आशा मात्र सहज ठेवतो. पण तिच्या शारीरिक विकासाची किंवा सुदृढ स्वास्थ्याची काहीच काळजी घेत नाही. तिला कमजोर बनवितो यांकडे कुणाचेही लक्ष नसते.  तिला कधीच संतान पालन पोषणाची , उच्च शिक्षा देण्याची साधी चर्चा सुद्धा करीत नाही. परंतु मुलांना उच्च पदवीधर बनले पाहिजेत हि आशा  मातेकडून ठेवल्या जाते.

महत्वाचे म्हणजे मुली-मुलांच्या शिक्षणातूनच सामान्य ज्ञान, होम सायंस, असे अजून काही आवश्यक विषयच वगळून टाकलेले आहेत. त्यांना म्हणजे मुला-मुलींना शिक्षणातून  या ज्ञानाची गरज आहे. तिथूनच सुसंस्काराची सुरवात होत असते. तेव्हाच भावी पिढी तयार होईल.  त्यांना शाळा कॉलेज म्ध्यॆ पाठवून बाह्य प्रदर्शनाला प्राधान्य देऊन निकामी शिक्षण जास्त दिल्या जाते. तेव्हा सीता, सावित्री, जिजाऊ सारख्या माता तयार कश्या होणार. शास्त्राने  स्त्री साठी कितीही उच्च गोष्टी लिहिल्या गेल्या असल्या तरी समाजात तिला हीन मानले गेले तर अपेक्षा भंगच होणार.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
11
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu