Bhoopali Sainatha-This Bhoopali is sung in the worship of God Sainath also known as Shirdi Sai Baba by their devotees. Utha Utha Shri Sainatha Guru Charan Kamal Dyawa.
उठा उठा श्री साईनाथा गुरु चरण कमळ दावा | आधीव्याधी भवताप वारुनी तारा जडजीवा|| धृ ||
गेली तुम्हा सोडुनिया भवतम रजनी विलया | परी हि अज्ञानाची तुमची भुलवी योगमाया |
शक्ती न आम्हां यकिंचितहि तिजला साराया | तुम्हीचं तींते सारुनी दावा मुख जन ताराया ||
भोसाईमहाराज भवतिमिर नाशक रवि | अज्ञानी आम्ही किती तव वर्णावी थोरवी|
ती वर्णिता भागलें बहुबद्नी शेष विधी कवि | सकृत होऊनी महिमा तुमचा तुम्हीच वद्वावा||१||
भक्त मनी सदभाव धरुनी जे तुम्हा अनुसरले | ध्याया सत्व ते दर्शन तुमचे द्वारी उभे ठेले |
ध्यानस्थां तुम्हास पाहुनी मन अमुचे धालें | परी तत्व चरणामृत प्राशायातें आतुर झाले ||२||
उघडूनी नेत्रकमळा दिनबंधू रमाकांता | पाहीं वा कृपादृष्टी बालका जशी माता | रंजवीमधुरवाणी हरी ताप साईनाथ||३||
आम्हीच आपुले कार्यास्तव तुज कष्ट्वितो देवा | सहन करुनी तें आम्हां भेट द्यावी साई देवा||४||