Shri Pandhari Rajachi Aarti-This aarti is sung in the worship of God Pandhuranga also known bye the name of Vitthala and Vithoba.The most important festivals of Vithoba are held on the Ekadashi day in the month of Aashadha and Prabodhini Ekadashi in the month of Kartik at such days this aarti is sung by the devotees of God vithoba.
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा|
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आलें गा, चरणी वाहें भीमा उद्धारी जगा ||१||
जयदेव जयदेव जय पांडूरंगा रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ||धृ||
तुलसीमाळा गळां कर ठेऊनि कटीं, कासें पितांबर कस्तुरी लल्लाटी|
देव सुरवर नित्य येती भेटी, गरुड हनुमंत पुढें उभें राहती ||२||
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा, सुवर्णाची कमळे वनमाळा गळा|
राही रखुमाबाई राणीचा सकळा, ओवाळीती राजा विठोबा सावळा || ३ ||
ओवाळूं आरत्या कुरवंड्या येती चंद्रभागेमाजी सोडुनिया देतिं|
दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती ||४||
आषाढी कार्तिकी भक्तजन येतीं, चंद्रभागे माजी स्नानं जे करीती|
दर्शन हेळामात्रे तयां होय मुक्ती, केशवासी नामदेव भावें ओवाळीती ||५||