Shankarachi Aarti : ‘Lavthavti Vikrala’ is a Marathi Devotional Aarti sung in glory of the supreme Hindu deity, Lord Shiva. This aarti is recited by the devotees on most occasions related to Lord Shiva especially on Maha Shivaratri day to worship their supreme god.
लवथवती विक्राळा ब्रम्हांडी माळा विषें कंठ काळा त्रिनेत्रिं ज्वाळा|
लावण्य सुंदर मस्तकी बाळा | तेथुनियां जल निर्मळ वाहें झुळझुळा ||
जयदेव जयदेव जय श्री शंकरा , आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ||धृ ||
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा|
विभूतीचें उधळन शितिकंठ निळा, ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ||२||
देवीं दैत्ये सागरमंथन पै केलें, त्यामाजी अवचित हळाहळ उठिले|
ते त्वां असुरपणे प्राशन केले , निळकंठ नाम प्रसिद्ध झालें ||३||
व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी|
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी, रघुकूळ टिळक रामदासा अंतरी || ४ ||