Sadguru Rayachi Pradakshina-This aarti is sung in the worship of god Dattatreya who is also known by the various names. One of the famous name in all is Datta is a hindu deity considered to be an avatar of three gods collectively known as Trimurti. Get All types of Aarti collection on Marathi Unlimited.
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरू रायाची, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||धृ||
गुरुभजनाचा महिमा न कळें आगमा निगमासी, अनुभव तें जाणती गुरुपदिंचे अभिलाषी ||१||
पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी, सर्वही तीर्थे घडली आम्हां, आदी करुनी काशी ||२||
मृदुंगतालघोळी भक्त भावार्थे गाती नाम संकीर्तने नित्यानंदे नाचती ||३||
कोटी ब्रम्हहत्त्या हरती करितां दंडवत, लोटांगण घालितां मोक्ष लाभे हो पायांत ||4||
प्रदक्षिणा करुनी देहभावं हरविला, श्री रंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ||५||