|| निजबोध रामाची आरती ||




Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

Nijbodh Ramachi Aarti – Nijbodh Ramachi Aarti is a Marathi Aarti sung in glory of the Shri Ram who is the seventh avatar of lord krishna and king of Ayodya. This aarti is recited by the devotees on most occasions related to Lord Shri Ram.

unnamed

जयदेव  जयदेव  निजबोध रामा,परमार्थे आरती सदभावे आरती परिपूर्ण कामा ||धृ ||

स्वस्वरूपोन्मुखबुद्धी वैदेहि नेली, देहात्मकाभिमाने दशग्रीवें हरिली|

सद्विवेकमारुतीनें सद्बुद्धी आणिली, तव चरणांबुजिं येवूनी वार्ता श्रुत केली || १||

उत्कट साधुनि शिळा सेतू बांधुनी, लिंगदेह  लंकापुरी विध्वंसुनी|

कामक्रोधादिक राक्षस मर्दुनी, देह अहंभाव रावण निवटोनी ||२||

प्रथम सीता सुद्धी हनुमंत गेला, लंकादहन करुनी अख्या मारिला|

मारिला जंबूमाळीं भुवनी त्राहाटिला, आनंदाची गुढी घेउनियां आलां ||३||

निजबळेनिजशक्ती सोडविली सीता, म्हणुनी येणें झालें अयोध्ये रघुनाथा|

आनंदे ओसंडे वैराग्य भरतां, आरती घेउनियां आली कौसल्यामाता ||४||

अनुहत वादित्र ध्वनी गर्जती अपार, अठरा पद्में वानर करिती भूभू:कार|

अयोध्येसी आलें दशरथ कुमार, नगरी होत आहें आनंद थोर ||५||

सहज सिंहासनी राजा रघुवीर , सोहं भावें तया पूजा उपचार|

सहजांची आरती वाद्यांचा गजर, माधवदास स्वामी आठव ना विसर ||६||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा