कारल्याची रस भाजी




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Recipe for Karlyachi Rasa Bhaji – Here is the recipe for karlyachi rasa bhaji. Bitter gourd or karle is the vegetable liked by very few people, yet having significant health and nutritious values.

karlyachi bhaji

 

साहित्य -: पाव किलो कारली, पाव वाटी दाणेकुट तसेच भाजलेल्या तिळाचा कुट पाव वाटी, चिंचेचा कोळ एक मोठा चमचा, किसलेला गुळ पाव वाटी, दीड चमचा तिखट, मीठ, तेल, फोडणीचे साहित्य .

कृती -:  1. कारल्याच्या बिया काढून, मध्यम आकाराच्या उभ्या फोडी कराव्या.

2. अर्धा चमचा हळद व एक चमचा मीठ चोळून तासभर तशाच ठेवाव्या.

3. नंतर घट्ट पिळून घेवून एक ते दोन वाट्या पाणी घालून शिजवून घ्याव्या. नंतर त्यातील पाणी काढून घ्यावे.

4. अर्धी पळी तेलाची फोडणी करून यात शिजलेल्या कारल्याच्या फोडी घालाव्या. दोन मिनिटे भाजी परतून घ्यावी.

5. नंतर यात इतर सर्व साहित्य व अर्धी वाटी पाणी घालून मंद आचेवर दोन वाफा आणाव्या, त्यात रस्सा असला तरी चालेल.

6. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu