||ज्योतिर्लिंगाची आरती ||




Jyotirlingachi Aarti – ‘Jyotirlingachi Aarti’ is sung to worship jyotirlinga in the glory of Lord Shiva.The Lord Shiva blessed his devotees and declared that people who worshipped him in this form would be free from the fear of death and diseases.

jyotirlingas2

जयदेवा निळकंठा सकल देवां आदिश्रेष्ठा,रंक मी शरण आलो, निवारी भवकष्टा ||धृ||

निर्गुण निर्विकारा, शिवा कर्पूरगौरा, व्यापुनी चराचरी, होसी प्रकृतिपरा|

अगणित कोटीं लिंगे, पुराण प्रसिद्ध बारा,एक तरी द्रुष्टी पाहें, अन्याया भूमिं भारा ||१||

सोरटी सोमनाथ, जगीं एक विख्यात तयांच्या दर्शनें हो,चुके संसार पंथ,

हिमवंत  पृष्ठभागी, लिंग केदार मुक्त, साधू संत सेविताती, धरुनी कैवल्य हेत ||२||

उज्जयिनी नाम पुरी पवित्र चराचरीं, महाकाळ लिंग जेथे,धन्य हो पूजा करिं |

ओंकार महाबळेश्वर , ज्योतिर्लिंग निर्धारीं, तयाच्या दर्शने हो जन्म मरण निवारीं ||३||

पश्चिमे लिंग एक जया नामं त्र्यंबक, गौतमी उगम जेथें, वाहें मंगलदायक|

दर्शन स्नान मात्रें, पुण्य पावन लोकं, तैसाच धृष्नेश्वर, सेवाळे रमणिक ||४||

भीमेंचां उगम जेथें, भीमा शंकर तेथें, डाकिनी स्नान करीतीं, लिंग म्हणती त्यांते|

अगणित पुण्य जोडें चालतांची तेणें पंथें, दक्षिण रामेश्वर, ज्योतिर्लिंग म्हणती त्यातें ||५||

आवंढ्या नागनाथ देव आपण नांदत, भक्त जन कुटुंबीया भक्तिमुक्ती दायक|

प्रत्यक्ष लिंग जेथें परळी वैजनाथ, हरिहर तीर्थें तेथें, जय होय कृतार्थ ||६||

श्रीशैल तो पर्वत, लिंग रूप समस्त, सभोवती निळगंगा, माजी श्रीमल्लिना |

भूमी कैलास दुजा जन साक्षी दावित , साठी विरुक्षे वाट पाहें, कृपाळू तो उमाकांत ||७||

धन्य हो काशीपुरी  मनी कर्णिकातीरी, विश्वेश्वर लिंग जेथें, जीव मात्रा उद्धरी|

तारक ब्रम्ह मंत्र, जपें कर्ण विवरीं, तेणेंची मोक्षपद, प्राप्त होय निर्धारी ||८||

येउनिया संसारा माजी ज्योतिर्लिंगे बारा, एक तरी दृष्टी पाहें  अन्यथा भूमी भारा|

विश्वेश्वर विश्वनाथ भावभक्ती निर्धारा नामया श्री शिवदास ध्याय परात्परा, जयदेवा निळकंठा ||९||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड