How to perform Kanya pooja in Navratri – Kanya Poojan is an integral part of Navratri Festival. Small girls or Kanyas are considered as Nine forms of Goddess Durga and are worshipped to please the goddess. Here is, How to perform the Kanya Poojan in order to make the Kanya pooja more meaningful and fruitful.
देवीच्या प्रीतीसाठी ब्राम्हण सुवासिनी किंवा मुलींचे भोजन घालावे परंतु कुमारिका भोजन पूजन अतिफलदायी आहे. कुमारिका दोन वर्षापासून ते दहा वर्षाच्या असाव्यात. दोन वर्षाची कुमारी वैष्णवी, तीन वर्षाची त्रिमूर्ती, चार वर्षाची कल्याणी,पाच वर्षाची रोहिणी, सहाची कालिका, सातची चंडिका, आठची शांभवी, नऊची दुर्गा, दहाची सुभद्रा या नावाने पुजावी. त्याचप्रमाणे भोजन किंवा दुध, फळे असा आहार द्यावा; वस्त्रालंकार, हार गजरे, फुले, हळद, कुंकू, कर्ण भरणादि अलंकार देवून अत्यंत आनंदाने संतुष्ट करून निरोप द्यावा. कुमारिका व्यंग नसावी. या मुलींचे कौमार्य, सौंदर्य, चैतन्य, मृदुत्व व निरागसता या पाच अदृश्य गोष्टींचे हे पूजन आहें. याप्रमाणे ब्राम्हणाने ब्राम्हण, क्षत्रियाने क्षत्रिय, वैश्याने वैश्य याप्रमाणे सजातीय पूजन करावे. परंतु विशेष कामनेसाठी विजातीय कुमारिकांचेच पूजन इष्ट होय. सर्व इष्ट प्राप्तीसाठी ब्राम्हणी कुमारिकेचे व यशस्वी होण्यासाठी क्षत्रिय मुलींचे व धनलाभासाठी वैश्य मुलींचे व पुत्रप्राप्तीसाठी शुद्र कुमारिकांचे पूजन लाभदायी आहे. हेच स्कंद पुराणी सांगितल्या गेले आहे. याप्रमाणे लाभ होय.
* कुमारिकांचे आवाहन मंत्र :
मन्त्राक्षरमयी लक्ष्मी मातृणा रुप धारिणीम |
नवदुर्गात्मिकां साक्षात्कन्या मावाहयाम्यहम ||
या मंत्राने आवाहन करावे व नंतर त्यांच्या वयांनुसार त्यांचे पूजन करावे.
* दोन वर्षाची कुमारिका :
सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती स्वरूपिणी |
पूजां गृहाण कौमारी जगन्मात र्नमोस्तुते ||
* तीन वर्षाची – त्रिमूर्ती :
त्रिपुरांत्रिपुरांधारा त्रिंवर्षा ज्ञानरुपीणीम |
त्रैलोक्य वन्दिता देवी त्रिमूर्ती पूजयांम्यहम ||
* चार वर्षाची – कल्याणी :
कलात्मिकां कलातीताम कारुण्यह्रुदयांशिवाम |
कल्याणदेवीं जननी देवी कल्याणीम पूजयांम्यहम ||
* पाच वर्षाची – रोहिणी :
अनिमादि गुणाधारा म्काराद्य क्षरात्मिका |
अनंतशक्तीकां लक्ष्मींरोहिणी पूजयांम्यहम ||
* सहा वर्षाची – कालिका :
कामचारा शुभां कान्तां कालचक्रस्वरूपिणीम |
कामदा कारुणोदारां कालिकां पुजम्यामहम ||
* सात वर्षाची – चंडिका :
चंडविरांचडमायां चंडमुंडप्रभंजिनीम |
पूजयामि सदा देवी चंडिका चंडविक्र मामं ||
* आठ वर्षाची – शांभवी :
सदानंदकरी शांतासर्वदेवनमस्कृताम |
सर्भुतात्मिका लक्ष्मी शांभविं पूज यांम्यहम ||
* नऊ वर्षाची – दुर्गा :
दुर्गमे दुस्तरे कार्ये भवदुख: विनाशीनिम |
पूजयामि सदा भक्त्या दुर्गा दुर्गार्तीनाशिनिम ||
* दहा वर्षाची – सुभद्रा :
सुंदरीस्वर्णवर्णाभां सुखसौभाग्यदायीनिम |
सुभद्र जननी देवीं सुभद्रां पूजयांम्यहम ||
या प्रमाणे आवाहन करून त्यांच्या पायावर दुधपानी घालून यथाशक्ती पादप्रक्षालन करून हार, गजरा, फुले, हळद, कुंकू, धूप, दीप, पायस देऊन कुमारिकांचे पायावर मस्तक ठेवून पूजन करावे.. यथाशक्ती भोजन द्यावे .
कुमारी प्रार्थना …
जगत पुज्ये जगद्वंदये सर्व शक्ती स्वरूपिणी |
पूजां गृहाण कौमारी जगन्मातर्णमोस्तुते ||
या प्रार्थनेने आनंदाने निरोप द्यावा …..