“ग्राहक राजाचा दरबार…”
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Grahak Rajacha Darbar-Nowadays, every activity like form submission, application for job or for any other work like shopping too all the tasks are carried out by online.Now a days online shopping is one of the simplest thing to do a shopping and saving our valuable time through this method we can directly buy the goods or services from a seller.

Grahak Rajacha Darbar

 

दुकानात गेल्या नंतर कोणतीही खरेदी असो मनासारखी झाली तरच परिपूर्ण सामाधान मिळते. खरेदीत आपल्याला हवे असते ते सर्वोत्तम पर्याय आणि सर्वोत्तम किंमत परंतु त्याकरिता आपल्याला दहा दुकाने फिरावी लागतात.पण कधी ते कष्ट सुद्धा आपल्याला नको असते. त्यामुळे खरेदी मनासारखी होणे शक्य नसते तेव्हा आता काही वेबसाईट्स आपले हे कष्ट वाचवू शकतात व खरेदी सुद्धा चांगल्या प्रकारे होते.

www.compareindia.in.com हे अनेक  प्रोडक्टची माहिती देणारे आणि त्यांची तुलना करणारं महत्वाचं संकेत स्थळ आहे ह्या संकेत स्थळाचे अजून एक वैशिष्टय, हे वापरून उत्पादनाची तुलना केल्यानंतर आपल्याला एक रिसीट मिळते  जी संकेतस्थळाशी संलग्न असणाऱ्या दुकानात दिल्यावर आपल्याला घसघशीत म्हणजे २ ते ३५ टक्के सवलत मिळते.व त्यासाठी या संकेत स्थळाचे सदस्यत्व स्विकारण्याचीहि गरज नसते. या संकेत स्थळावर आपल्याला एकूण ७ श्रेणीची उत्पादने खरेदी करता येतात. ह्या मध्ये इलेक्ट्रोनिक्स, मोबाईल्स,संगणक,घरघुती उपकरणे,आणि एक्सेसरिज यांचा सामावेश आहे. या संकेत स्थळावर उत्पादनाची तुलना करण्यासाठी आपल्याला चार पर्याय दिले जातात.

*  कॉलिटी आणि कंपनीचे नाव

*  आपले बजेट

*  त्या उत्पादनात आपल्याला हवे असलेले फीचर्स

*  अधिक फीचर्स

ह्यातील कोणत्याही एका किंवा चारही पर्यायांची आपण जस जशी निवड करीत जातो तसतसे त्याच पानावर खाली उत्पादनाची छायाचित्रे व डॅशबोर्ड तसेच या संकेत स्थळावरची त्यांची किंमत व बाजार भाव प्रदर्शित केले जाते. जर आपण संगनकाच्या दोन किंवा तीन प्रकारातली तुलना करीत असू तर त्या संगनकाच्या सर्व पार्टसची पूर्ण यादी उदा: हार्ड डिस्क, व्हीडीओ कार्ड,ऑपरेटिंग सिस्टीम,विक्री ई. आपल्या समोर डॅशबोर्ड च्या स्वरूपात प्रदर्शित होतात. नंतर त्या छाया चित्रांवर क्लिक केले कि आपल्याला त्या उत्पादनांची इतंभूत माहिती मिळते. ह्याच पानांवर आपल्याला उत्पादन विकणाऱ्या मुळ कंपनीची माहितीही मिळू शकते. तसेच आपल्याला त्या उत्पादनाबद्दल ईतर ग्राहकांनी नोंदवलेली त्यांची मतेहि वाचता येतात. या खेरीज त्या उत्पादनाची आपल्या राज्यातील व आपल्या शहरातील वितरकांबद्दलची माहिती (पत्ता,दूरध्वनी क्रमांक,संपर्काचे नाव) मिळते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu