Bajra Vati – Bajra Vati is a marathi dish made of Bajri, Udad dal, corieander, garlic paste etc. Here is the recipe of making the Bajra Vati, A healthy dish that consist nutritional value also.
साहित्य -: २५० ग्राम बाजरा पीठ, १०० ग्राम उडदाची डाळ ( सोला), हिरवी मिरची, आलें, लसून पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडे काजूचे तुकडे, थोडे किसमिस, मीठ, तिखट चवीनुसार व अर्धा चमचा जिरे पावडर आणि थोडा गोडा मसाला.
कृती-:
१. डाळ स्वच्छ करून भिजवून ठेवावी, नंतर ती वाटून घ्यावी. त्यात आले लसून पेस्ट, तिखट, मीठ चवीनुसार व जिरे पावडर आणि गोडा मसाला घालावा आणि त्याची साधारण घट्ट पेस्ट तयार करावी.
२. बाजरा पीठ घट्ट भिजवून घ्यावे आणि त्याचे गोळे तयार करावे.प्रत्यक गोळ्याला लाटून त्यात ते घट्ट सारण घालुन नंतर एक किसमिस व काजू तुकडा व बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालुन बंद करून घ्यावी. याप्रमाणे सर्व गोळे तयार करून घ्यावे.
३. एका पातेल्यात पाणी गरम करावे पाणी चांगले उकळीला आले कि त्यात ते एक एक करून गोळे घालावे. पाणी तेज आचेवरच ठेवावे.
४. काही वेळात ते गोळे पाण्यावर वर वर तरंगतात तेव्हा ते शिजले असे समजावे. नंतर ते एक एक असे पाण्यातून काढावे.
५. गोळे थंड झाल्या नंतर मधल्या भागातून काप द्यावे व गरम तेलातून ते काप चांगले तळून काढावे . स्वादिष्ट वाटी तयार चटणी सोबत खाण्यास द्यावे.