Avadhutachi Aarti-This aarti is sung in the glory of god Dattatreya.God Dattatreya is also known by the name Datta considered to be an avatar of three hindu gods Brahma,Vishnu and Shiva collectively known as Trimurti.
जयदेव जयदेव जयजय अवधूता, अगम्य लीला स्वामी त्रिभुवनी तुझी सत्ता ||धृ||
तुझें दर्शन होतां जाती हिं पापें स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरीतें|
चरणी मस्तक ठेउनी मनीं समजा पुरतें,वैकुंठीचे सुख नाहीं यापरतें ||१||
सुगंध केशरभाळी वर टोपीतिळां,करणी कुंडलें शोभती वक्ष; स्थळी माळा|
शरणागत तुज होतां भय पडले काळां, त्झेम दास करिती सेवा सोहळा ||२||
मानवरूपी काया दिससी आम्हास,अक्कलकोटी केलां यतींवेषें वास|
पूर्णब्रम्ह तोचि अवतरला खास, अज्ञानी जीवासी विपरीत हा भास ||३||
निर्गुण निर्विकार विश्वव्यापक, स्थिरचर व्यापक अवघा उरलासी एक|
अनंत रूपे धरिसी करणें मायिक, तुझें गुण वर्णिता थकले विधिलेख ||४||
घडतां अनंत जन्म सुकृत हे गांठी, त्याची हि फलप्राप्ती सद्गुरूची भेटीं|
सुवर्ण ताटीं भरली, अमृतरसवाटी, शरणागत दासावरी करीं कृपादृष्टी||५||