||तुकोबाचे अभंग||
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Tukobache Abhang – Sant Tukaram is one of the great saint from Maharashtra who devoted his whole life in the feets of Lord Vitthala. To praise Lord Vitthala or Vithoba, he created many  small poetries called as Abhanga’s. In addition to praise the Lord, he also gave useful messages to common people through his Abhanga’s.

 

Sant Tukaram

माप म्हणे मी माविते , भरी धनी ठेवी रिते |

देवा अभिमान नको , माझे ठायी देउ सको ||

देशी चाले सिका , रितें कोण लेखी रंका |

हाती सूत्र दोरी , तुका म्हणजे त्याची थोरी ||

भावार्थ: आपण मापाने धान्य मोजतो. तेव्हा मापाला वाटते मी मोजणारा आहे. पण मोजणारा धनी आहे, तोच माप भरतो आणि रिकामे तोच करतो. तेव्हा मापाचा अभिमान हा कुचकामी आहे.

म्हणून हे देवां, माझ्या ठिकाणी अभिमानाचा शिरकाव कधीच होऊ देऊ नको. देशामध्ये ज्याच्या हाती सत्ता आहे, त्याला महत्व आहे. त्याच्या शिक्क्याने कागदालाही चलनाचा मान प्राप्त होतो. म्हणून ज्याच्या हाती सत्तेची सूत्रे आहेत , तो मोठा. सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही, हेच खरे!

तुकाराम महाराज म्हणतात ,  माप, धान्य आणि मोजणारा या तीन वेगळ्या गोष्टी आहेत. येथे माप आणि धान्य यांना महत्व असले तरी ते दुय्यम आहेत, कारण त्या निर्जीव गोष्टी होत. मोजणारा धनी हा सक्रीय असून त्याच्या निर्णयाप्रमाणे कृती घडत असते. ‘मी मोजतो’ हा मापाचा अभिमान निरर्थक आहें आणि माझ्यामुळे माप भरले हा धान्याचा दावाही व्यर्थ आहे. तेथील सारी सत्ता मोजणाऱ्याच्या हाती असते.

तात्पर्य : माप आणि धान्य यांनी आपले स्थान व कार्य लक्षात घ्यावे  हेच सत्य. ( तुका म्हणे )

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
2 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu