Title song of marathi movie ‘Talim’ has been launched recently by Honorable chief Minister Mr Devendra Fadanvis of Maharashtra. Movie is based on the sport Kushti.
५९ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच नागपूरमधील चिटणीस पार्क येथे पार पडली. ‘तालीम’ या मराठी चित्रपटाची सध्या निर्मिती प्रक्रिया सुरु असून हा चित्रपट कुस्तीशी निगडीत आहे. ‘तालीम’ या चित्रपटाच्या निमित्ताने कुस्ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. एनएमआर फिल्म्सची प्रस्तुती तसेच श्री. कमल शहा यांची सहनिर्मिती असलेल्या ‘तालीम’ या चित्रपटातील “तालीम रंगू दे….” या शीर्षकगीताचे प्रकाशन महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान मा. मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस तसेच ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी चित्रपटाचे सहनिर्माते श्री. कमल शहा, दिग्दर्शक नितीन मधुकर रोकडे, प्रमुख कलाकार अभिजीत श्वेतचन्द्र आणि प्रशांत मोहिते, लेखक सिब्तेन शाहीदी, कॅमेरामन सईद लायक अली, कास्टिंग डायरेक्टर तसेच कॉस्च्युम डिझायनर चैत्राली डोंगरे उपस्थित होते. ‘तालीम’ या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच हा चित्रपट कुस्तीशी निगडीत असल्याच जाणवत. “तालीम रंगू दे….” हे शीर्षकगीत ‘तालीम’ च्या कथेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असून हे गीत स्फूर्तीदायक आणि प्रेरणा देणारे असे आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रारंभ होणार आहे.