Sant Tukaramachi Abhangwani – Sant Tukaram is one of the great saint from Maharashtra who devoted his whole life in the feets of Lord Vitthala. To praise Lord Vitthala or Vithoba, he created many small poetries called as Abhanga’s. In addition to praise the Lord, he also gave useful messages to common people through his Abhanga’s.
सोनियाचे ताट क्षीरीने भरिले , भक्षावया दिले श्वानालागी|
मुक्ताफळाहार खरासी घातला, कस्तुरी सुकरा चोजविली||
वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान, तयांची ते खूण काय जाणे|
तुका म्हणे ज्याचे तोचि एक जाणे, भक्तीचे महिमान साधू जाणे||
भावार्थ : सोन्याच्या ताटात दुध टाकले, ते ताट कुत्र्यापुढे ठेवले तरी कुत्र्याला त्याची चव कळू शकत नाही. गाढवाला गुळाची चव काय ? गाढवाच्या गळ्यात मोत्याचा हार घातला त्याचे त्याला काय कौतुक वाटणार आहे? कस्तुरी डुकराच्या नाकाला लावली , त्याला तिची गोडी काय कळणार आहे? कस्तुरीचा गंध डुकरासारख्या गलीच्छ आणि ओंगळ पशुजीवाला काय कळणार ? वेदपरायण पुरुषाने बहिऱ्याला ज्ञान सांगण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्याला त्याचे काही गम्य वाटू शकत नाही. वास्तविक ज्याचे त्यालाच कळते, समजते, भक्तीचा महिमा साधुलाच कळू शकतो. म्हणून प्रत्येकानेच आत्मशोध घेतला पाहिजे.
म्हणून तुकाराम महाराज म्हणतात कि प्रत्येकाची एक कुवत असते, ती त्याला कळली पाहिजे. तसेच ज्याचा त्याच्याशी सबंध असेल, त्याने ती ओळखली पाहिजे. भक्ती हा परमेश्वराशी संवाद साधण्याचा एकमात्र मार्ग आहे. ज्याला तो कळला तोच त्या मार्गाने जातो. म्हणून प्रत्येकाने भक्ती मार्ग शोधला पाहिजे. त्याशिवाय इष्ट फलप्राप्ती होऊ शकत नाही.