करिअरसाठी …. शिका सायबर लॉ




Like
Like Love Haha Wow Sad Angry
11

There are lots of courses for studies. Over the years, crime rate has been grown in cyber world. Therefore it was necessary to study cyber crimes and make laws to prevent people from those cyber crimes. Now, as the whole world is going for E-systems, there is also growth of cyber crimes day-by-day and hence there is a growing need to learn cyber laws.

Cyber-Laws

सध्याच्या बदलत्या तांत्रिक युगात नव्याने निर्माण झालेल्या अभ्यासक्रमामध्ये सायबर लॉ संबंधित अभ्यासक्रमाचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. इंटरनेटशी संबंधित असलेल्या व्यवहारामध्ये कायद्याचा प्रश्न येईल तेथे सायबर लॉ लागू होईल. विषय नवा आहे, तांत्रिक आहे, त्यामुळे त्याचे विशेष अभ्यासक्रम आयोजित केले गेले आहेतच पण सर्वात महत्वाची बाब अशी की या कायद्याला राज्याच्या किंवा देशाच्या सीमा लागू नाहीत. इंटरनेटचे विश्व आंतरराष्ट्रीय आहे; त्यामुळे त्याच्या व्यवहाराला भौगोलिक सीमा नाहीत. पर्यायाने कायद्याला भौगोलिक सीमा नाहीत. या कायद्याच्या अंतर्गत ई-बिजनेस , ई-कॉमर्स, ई-गव्हर्नन्स आणि ई-प्रोक्युरमेंट असे सगळे व्यवहार आहेत.  भारत सरकारने आयटी ऑक्ट-२००० हा कायदा मंजूर केला आहे. या कायद्याखाली इंटलेक्चुअल प्रापर्टी, कॉपीराईटस आणि ट्रेडमार्क्स इत्यादीसंबंधीचे कायदे अंतर्भूत केले आहेत.  हॉकिंग, क्रेडीट कार्ड संबंधीचे गुन्हे, सायबर स्टौकिंग, पोर्नोग्राफ आणि ब्लकमेलिंग हे सगळे गुन्हे या कायद्याखाली हाताळले जातात. या कायद्याचे महत्व वाढत चालल्यामुळे त्याच्याशी संबंधित असलेल्या नोकरीच्या संधीही वाढत चालल्या असून त्या आकर्षक आहेत. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना अनेक प्रकारची तांत्रिक कामे करावी लागतात. त्यामुळे ती व्यक्ती तंत्रज्ञानात वाकबगार असलीच पाहिजे. सायबर लॉ च्या संबंधात प्राथमिक माहिती देणारा एक पदविका अभ्यासक्रम आहे आणि दुसरा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम आहे. पदविकेसाठी बारावी उत्तीर्ण असणे ही अट आहे तर पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिनारा उमेदवार हा कायदा पदवीधर असला पाहिजे.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
11




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा