||अभंग||




Like
Like Love Haha Wow Sad Angry
60

Abhang are the short poetries created to praise god known as “Vitthala” or “Vithoba”. The word Abhang means A – non and Bhang-interuptted ie, uninteruptted poetries to praise Vitthala. There are many saints who created Abhanga’s among whom Saint Tukaram is the one who was a great devottee of Vitthala and had created many abhanga’s, one of which is presented in this post:

Tukoba

न लगे चंदना, सांगावा परिमळ , वनस्पतीमेळ हाकारुनी|

अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी , धरिता ही परी आवरेना||

सूर्य नाही जागे करत या जना , प्रकाश किरण कर म्हुण|

तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही||

भावार्थ :  चंदनाला आपल्या सुगंधाची जाहिरात करावी लागत नाही. परिसरातील वनस्पतींना हाका मारून आपल्या परीमळांची प्रसिद्धी करावी लागत नाही. त्याचे गंधवैभव सगळ्यांना आपोआप कळते, कारण जे अंतरंगात असते ते स्वभावत:च बाहेर पडत असते; त्याला आवरून धरले तरी ते प्रकट होत असते. व्यक्त होणे हा त्याचा स्वभाव आहे.  तसाच सूर्य लोकांना आपल्या किरणांचे महत्व पटवून देत नाही. ते मुळातच तेजस्वी असतात, त्यामुळे त्यांचा आपोआपच प्रभाव पडतो. सूर्य उगवला, त्याचे किरण सर्वदूर पसरले की, लोक आपोआपच जागे होतात. आकाशात मेघ दाटून आले की मोर आपोआपच नाचू लागतात. कारण मेघदर्शनाने आनंदित होऊन नाचणे हा त्यांचा स्वभावच असतो. जे खरे असते ते सहजपणे व्यक्त होत असते, ते कितीही लपविले तरी लपत नाही.

माणसाचा स्वभाव आपोआप प्रकट होतो म्हणून त्याने सहजपणे आणि अनौपचारिक वर्तन करावे. त्या वर्तनातून माणसाचा स्वभाव नकळतपणे दिसून येत असतो. याचाच अर्थ “वागणे आणि बोलणे यात तफावत असू नये” कारण खरे लपत नाही आणि खोटे लपवण्यासाठी जाणीवपूर्वक धडपड करावी लागते. उक्ती आणि कृती यात जेव्हा अंतर पडते तेव्हा माणसाचे व्यक्तिमत्व दुभंगते. चंदनाचा  परिमळ दरवळतो, सूर्य किरणांचा प्रकाश पडतो, आभाळ मेघांनी भरून आले कि मोर नाचतो.  ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ आणि ‘लपविता खरे येत नाही’ या वचनांतून माणसाने आपल्या आचरणासंबंधी आवर्जून ध्यानात घ्याव्या, अशा महत्वाच्या सूचना संत तुकारामांनी केलेल्या आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
60




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा