Paneer Dhokla is an Indian snack full of taste. This tasty snack is easy to cook and can be made easily anytime. Paneer Dhokla is a variation of Dhokla adding cheese into it and increasing its nutritional values.
साहित्य -: चार चमचे साखर, दोन चमचे मीठ, एक चमचा निंबूसट पावडर, खाण्याचा सोडा एक चमचा, २५० ग्राम बेसन , २०० ग्राम पनीर.
कृती -:
- एक गिलास पाणी घेऊन त्यात साखर , मीठ आणि निंबूसट घोळून घ्यावा आणि ते पाणी दोन भांड्यात अर्धा अर्धा ग्लास टाकून त्यात अर्धा अर्धा बेसन मिळवून घ्यावा. त्यात अर्धा चमचा खाण्याचा सोडा मिक्स करून थोडे फेटून घ्यावे.
- नंतर प्लेन थाळीत बुडाशी तेल सारखे पसरून त्यावर ते बेसन ओतून घ्यावे.
- नंतर एका भांड्यात (थाळी व्यवस्थित बसेल असे भांडे) बुडाशी पाणी घालून त्यात ती थाळी ठेवावी व भांड्यावर झाकण ठेवून २० मिनिट मोठ्या आचेवर ठेवावे व नंतर आच बंद करून थोड्यावेळाने झाकण उघडून ढोकळे शिजले कि नाही हे बघण्यासाठी सुरीने त्याला टोचून बघून घ्यावे.
- सुरीला ढोकळा चिकटून आला तर तो कच्चा असेल, त्याला थोडावेळ अजून आच द्यावी; नाही तर शिजला असे समजावे.
- नंतर त्यावर पनीर (कीसलेले) पसरून घ्यावे.
- त्यावर दुसरे अर्धे बेसन पसरते ओतून घ्यावे आणि परत १५ मिनिट शिजवून घ्यावे; ढोकळा चांगला फुलतो.
- नंतर भांड्यात फोडणीसाठी तेल गरम करून त्यात थोडे हिंग, मोहरी, कढीपत्ता घालून फोडणी करावी. नंतर त्यात एक कप पाणी घालावे, थोडे ते उकळून घ्यावे.
- त्यानंतर ढोकळा बाहेर काढून त्याचे तुकडे कापावे, त्यावर ते पाणी एकसारखे ओतावे व त्यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पसरावी.
- मोठ्या प्लेटमध्ये ढोकळ्याचे तुकडे सजवावे, त्यावर ओल्या नारळाचा कीस व डाळिंबाचे दाणे घालावे व पुदिना चटणीसोबत सर्व्ह करावे.