||आरती श्री तुळसीमातेची||




Tulsi Aarti is sung for Goddess Tulsi who is also known as Vishnupriya – beloved of Lord Vishnu.  Tulsi (Holy Basil) is an important symbol of Hindu tradition and the Tulsi Plant is worshiped by Hindus all over the world. Watering Tulsi plant early morning and worshipping is a part of daily routine of almost every hindu family in India.

tulsi

जयदेवी जयदेवी जय मायें तुळशी | निजपत्राहूनी लघुत्तर त्रिभुवनी हें तुळसी ||धृ||

ब्रम्हा केवळ मुळी मध्यें तों शौरी | अग्रि शंकर  तीर्थे शाखापरिवारी ||

सेवा करिती भावें सकळही नरनारी | दर्शन मात्रें पापें हरती निर्धारीं ||१||

 

शीतल छाया भूतळ व्यापक तूं कैसी | मंजिरीची बहू आवड कमळारम णासी ||

तवदल विरहीत  विष्णू राहें उपवासी | विशेष महिमा तुझां शुभ कार्तिक मासी ||२||

 

अच्युत माधव केशव पितांबर धारी | तुझे पूजन काळी जो हें उच्चारी ||

त्यासी देसी संतती संपत्ती सुखकारी |गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ||३||

Like
Like Love Haha Wow Sad Angry




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड